Co Accused Granted Bail in Kamakshi Murder Case Dainik Gomantak
गोवा

Kamakshi Murder Case: कामाक्षी उड्डापनोव खून प्रकरण; प्रियकराच्या मित्राला जामीन मंजूर

Rajat Sawant

Co-Accused Granted Bail In Kamakshi Murder Case: कळंगुटमधील बुटीकमध्ये सेल्स गर्ल म्हणून काम करणारी कामाक्षी उड्डापनोवा या तरुणीचा तिच्या प्रियकराने खून केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी प्रियकर व त्याच्या मित्राला अटक करण्यात आली होती.

दरम्यान प्रियकराचा मित्र संशयित निरुपदी कडाकक्ल याला म्हापसा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कामाक्षीचा एक्स प्रियकर संशयित फकीर उर्फ प्रकाश चुंचवाड याला मदत केल्याचा निरुपदीवर आरोप आहे.

प्रेमसंबंध तोडले आणि बोलणे बंद केल्याने रागाच्या भरात पर्वरीतील कामाक्षी उड्डापनोवा या तरुणीचा तिचा प्रियकर संशयित प्रकाश याने शुक्रवारी (30 ऑगस्ट) खून केला.

गेल्या दीड वर्षांपासून ती तिचा प्रियकर प्रकाश याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. यानंतर त्यांचे नाते तुटले.

30 ऑगस्टला सकाळी कामाक्षीच्याच फ्लॅटवर जाऊन खून करण्यात आला होता. मित्राच्या मदतीने मृतदेह गाडीत टाकला आणि महाराष्ट्रातील आंबोली घाटात फेकून दिला.

कामाक्षीच्या भावाने पर्वरी पोलिस स्थानकात कामाक्षीचे अपहरण तसेच ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता कामाक्षीचा खून केल्याचे तिच्या प्रियकराने कबूल केले.

पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर सावंतवाडी पोलिस व पर्वरी पोलिसांनी आंबोलीतील घाटातून मृतदेह बाहेर काढला. मात्र तिच्या उजवा हात आणि पायाचा काही भाग मिळाला नाही.

दरम्यान मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कामाक्षीचा एक्स प्रियकर संशयित फकीर उर्फ प्रकाश चुंचवाड याला मदत केल्याप्रकरणी मित्र संशयित निरुपदी कडाकक्ल याला अटक करण्यात आली होती. गुरुवारी म्हापसा न्यायालयाने संशयित मित्राला जामीन मंजूर केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

SCROLL FOR NEXT