Success Story : 'सागर' पासून 'समृद्धी' पर्यंत २१ वर्षांचा प्रवास करणारे सुनील गणपुले

तुळशीमळा आणि पर्ये अशा दोन्ही ठिकाणी मिळून १३ हजार स्क्वेअर मिटर जागेत आपली नर्सरी चलविणारे कारांपूर तिस्क येथील सुनील गणपुले.
Dainik Gomantak
Dainik GomantakDainik Gomantak
Published on
Updated on

अनंत काळापासून फुलणारी विविधरंगी, विविधढंगी फुले, आपल्या सौंदर्याने केवळ पशुपक्षांना आणि कीटकांनाच नव्हे तर माणसालाही नेहमीच मोहात पाडते आणि भावनांना मोहून घेते. त्यामुळे प्रत्येकाला ही आनंद देऊन जातात

पर्ये येथे असलेली ‘समृद्धी नर्सरी’ तशी जुनीच. २००५ साली सुनील गणपुले यांनी ती सुरू केली. तुळशीमळा आणि पर्ये या दोन्ही ठिकाणि त्यांची नर्सरी आहे. याबद्दल अजून सविस्तर माहिती त्यांनी गोमंतक ला दिली.

Dainik Gomantak
Goa Film City: फिल्म सिटीसाठी खासगी जमिन कशासाठी? सरकारी भूखंड का वापरत नाही? युरी आलेमाव यांचे सवाल...

कारापूर तिस्क येथील सुनील गणपुले यांनी बारावी पर्यन्तचे शिक्षण घेतल्यावर पार्टनरशीप मध्ये व्यवसायाला सुरवात केली. १९९२ मध्ये तो व्यवसाय बंद झाल्यावर पुढे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी आनंद फळारी यांनी आपल्या ‘सागर नर्सरीत’ येण्याचा सल्ला त्यांना दिला.

या आधी कधीच त्यांनी नर्सरीत काम केले नव्हते. पण २ ते ३ महीने मन लावून काम केल्यावर हळूहळू त्यांना सर्व माहिती प्राप्त झाली. कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा पाहून थोड्याच दिवसांत संपुर्ण नर्सरीची जबाबदारी त्यांचा खांद्यावर देण्यात आली. तिथून नर्सरीच्या प्रवासाला त्यांचा प्रारंभ झाला.

Dainik Gomantak
Margao News : मडगावात आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव ; रवींद्र भवनमधील कॅंटीन ४ वर्षांनंतर लोकांच्या सेवेत

त्यावेळी बाजारात काजूला खूप मोठी मागणी होती आणि काजूची कलमे तयार करणारी आशिया खंडातील एकमेव सागर नर्सरी होती असे सुनील गणपुले यांनी सांगितले. त्याकाळी काजूची रोपे सगळीकडे लावली जायची पण कलमांची माहिती कुणालाच नव्हती.

याबाबत चा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ते मध्यप्रदेश, ओरीसा, आंद्र प्रदेश,  कर्नाटक अशा राज्यांमध्ये गेले. महाराष्ट्र राज्याच्या सरकारी संघटनेकडे मार्केटिंग करणारी व्यक्ति उपलब्ध नव्हती म्हणून त्यांनी १९९९ मध्ये सागर नर्सरी सोडली आणि तिथे रुजू झाले.

याबाबत चे कुठलेही ज्ञान नसताना त्यांनी व्हॅनीलाचे ८०% पीक काढले. त्यानंतर तिथे काजूची लागवड सुरू केली. पण काही विघ्नसंतोषी व्यक्तिंनी नर्सरी चालविण्यास अडथळे निर्माण केले. त्यानंतर तुळशीमळा येथे स्वतःच्या जागेत नर्सरी सुरू करण्याचा निर्णय घेतला.

२०११-१२ च्या दरम्यान गोव्यातील कृषि अधिकाऱ्यांना भेटून कलमं बांधायची टेंडर घेतली आणि सलग ३ वर्षे ५० हजार काजूची कलमे राज्यातील कोडार फार्म मध्ये तयार केली. आता तुळशीमळा आणि पर्ये अशा दोन्ही ठिकाणी मिळून १३ हजार स्क्वेअर मिटर जागेत आपली नर्सरी असल्याचे त्यांनी सांगितले.

जर कुणाला नर्सरी सुरू करायची असेल तर सर्वात आधी त्या व्यक्तीकडे सय्यम असायला हवा, लोकांची आवड काय आहे ह्याची माहिती हवी, बाजारात कुठल्या कलमांना जास्ती मागणी आहे हे कळायला पाहिजे आणि नर्सरी बाबत थोडीफार साधारण ज्ञान असायला हवे.  

सुनील गणपुले, कारांपूर तिस्क

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com