Kamakshi Murder Case Goa: कामाक्षी खून प्रकरण आणि 'RX 100' चित्रपटाचं कनेक्शन काय? आरोपीने केला मोठा खुलासा

कामाक्षी हत्याकांड प्रकरणी आरोपीने मोठा खुलासा केला आहे.
Kamakshi Murder Case Goa
Kamakshi Murder Case GoaDainik Gomantak

Kamakshi Murder Case Goa: कळंगुटमधील बुटीकमध्ये सेल्स गर्ल म्हणून काम करणाऱ्या कामाक्षी उड्डापनोवा या तरुणीचा तिच्या प्रियकराने शुक्रवारी (30 ऑगस्ट) खून केला. प्रेमसंबंध तोडून बोलणे बंद केल्याने रागाच्या भरात त्याने तिची हत्या केल्याचे समोर आले. याप्रकरणी दोघांना न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कामाक्षी हत्याकांड प्रकरणी आरोपीने मोठा खुलासा केला आहे. आरोपीने मैत्रिणीची हत्या करण्याची प्रेरणा कोठून मिळाली याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

30 ऑगस्ट रोजी सकाळी 9च्या सुमारास कामाक्षीचा तिच्याच फ्लॅटवर जाऊन खून करण्यात आला होता. याप्रकरणी तिचा एक्स प्रियकर फकीर उर्फ प्रकाश चुंचवाड व त्याचा मित्र निरुपदी कडाकक्ल याला अटक करण्यात आली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकाशला त्याचा मित्राने मदत केली होती.

गेल्या दीड वर्षांपासून ती तिचा प्रियकर प्रकाश याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. यानंतर त्यांचे नाते तुटले.

चौकशीदरम्यान आरोपीने खूनाची प्रेरणा कोठून मिळाली याचा खुलासा केला आहे. खूनाचा संपूर्ण प्लॅन बनवून त्याने हत्या केल्याचे सांगितले. दाक्षिणात्य चित्रपट 'RX 100' मधून प्रेरणा घेऊन आरोपीने हा गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगितले.

Kamakshi Murder Case Goa
Mumbai Goa Flight: खराब हवामानाचा इंडिगोच्या फ्लाईटला फटका, मुंबईला उड्डाण केलेले विमान 'मोपा'वर परतले

त्यानंतर मित्राच्या मदतीने मृतदेह गाडीत टाकला आणि सुमारे 80 किलोमीटरचा प्रवास करून महाराष्ट्रातील आंबोली घाटात फेकून दिला. दोघांनी मिळून मृतदेह 40/50 फूट खोल दरीत फेकून दिला. सोबतच याप्रकरणी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कामाक्षीचा मोबाईल देखील फेकण्यात आला.

पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर सावंतवाडी पोलिस व पर्वरी पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला मात्र तिच्या उजवा हात आणि पायाचा काही भाग मिळाला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com