Nilesh Cabral Goa Assembly  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: आयडीसी’ने गोदामांना जागा देऊ नये, उद्योग उभारावेत; नीलेश काब्राल

Goa Monsoon Assembly Session 2024: औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची स्थिती बिकट झाली आहे हे काब्राल यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: औद्योगिक विकास महामंडळाने (आयडीसी) राज्यात एकही चांगले काम केलेले नाही. उद्योग वाढावेत अशीच सर्वांची इच्छा असते. परंतु वेर्णा येथील जागा गोदामांसाठी दिल्या गेल्या आहेत. गोदामे उभारणे हा काही उद्योग नाही. गोदाम उभारून ती भाड्याने दिली जातात. त्यामुळे गोदामांसाठी मोठी जागा देऊ नये, असे नीलेश काब्राल यांनी विधानसभेत सांगितले.

गणेश गावकर आयडीसीचे चेअरमन असताना उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार आम्ही ‘आयपीबी’साठी जागा घेतली होती. काकोडा औद्योगिक वसाहतीती अनेक उद्योगांना जागा दिल्या. पण तेथे उद्योग सुरूच झाले नाहीत. औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची स्थिती बिकट झाली आहे, हे काब्राल यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. औद्योगिक वसाहती या केवळ गोदामांसाठी नाही, तर तेथे उद्योग उभारले जावेत. आयडीसीच्या कार्यालयांत अपुरा कर्मचारी वर्ग आहे, याकडेही त्‍यांनी लक्ष वेधले.

वाहतूक खात्याचे प्रशिक्षण केंद्र फोंड्यात उभारले जाणार असल्याचे तीन वर्षांपूर्वी जाहीर केले होते, त्याचे काय झाले, याचे उत्तर मंत्र्यांनी द्यावे. वाहने मोडित काढल्यानंतर त्यांना नवे वाहन खरेदी करताना सवलत देणारी योजनेचे काय झाले? असा सवालही काब्राल यांनी उपस्‍थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT