Goa Assembly Session: ‘गोवा माईल्स’वरुन विरोधक आक्रमक; एकाधिकारशाहीचा आरोप

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: वाहतूकमंत्री गुदिन्हो यांनी पंचायत, वाहतूक व उद्योग खात्याच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना हा प्रस्ताव मांडला होता
Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: वाहतूकमंत्री गुदिन्हो यांनी पंचायत, वाहतूक व उद्योग खात्याच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना हा प्रस्ताव मांडला होता
Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील रिक्षा व मोटारसायकल पायलट सेवाही गोवा माईल्स ॲपखाली आणण्याच्या सरकारी प्रस्तावाला विरोधी आमदारांनी आज रात्री विधानसभेत जोरदार विरोध केला. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी पंचायत, वाहतूक व उद्योग खात्याच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना हा प्रस्ताव मांडला होता.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई आणि आमदार वेन्झी व्हिएगस यांनी याला विरोध केला. ‘गोवा माईल्स’लाच विरोध असताना त्यांची एकाधिकारशाही निर्माण करण्यास सरकारने मदत करू नये, असे या आमदारांनी सरकारला ठणकावले.

राज्यातील टॅक्सीचालकांनी कायद्याच्या चौकटीत यावे, गोवा माईल्स किंवा गोवा ॲपला जोडले जावे, त्यासाठी आपण कोणावरही दबाव आणत नाही. अन्यथा टॅक्सीचालकांनी स्वतःचा ॲप करावे, आपण खात्यातून सर्व मदत करू, असे आश्वासन गुदिन्हो यांनी सांगितले. पणजी, मडगाव, फोंडा व वास्को येथील बसस्थानकांचा फेरविकास केला जाईल, असे त्यांनी नमूद केले. बसपोर्ट ही संकल्पना सोडून दिलेली नाही त्याचाही पाठपुरावा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सभागृहात चर्चा बरीच झाली आहे. आता आपण मागे जाणार आहोत की, पुढे जाऊन अद्ययावत तंत्र स्वीकारणार आहोत, याचा विचार करायला हवा. मनोहर पर्रीकर यांनी ही टॅक्सी सेवा आणली आहे, ती आम्ही अभ्यास करूनच कार्यान्वित केली आहे. वाहतूक सेवा अत्यंत स्वस्त मिळावी म्हणून ही सेवा सुरू केली आहे.

वाहतूक सेवा ही मोठी समस्या ही तुम्ही मानत आहात. गोवा माईल्स किंवा गोवा ॲपला जोडावे, असा दबाव आम्ही आणलेला नाही. टॅक्सीचालकांनी स्वतःचा ॲप करावा, आम्ही खात्यामार्फत सर्वती मदत करू. काही टॅक्सी लोक उबेर कंपनीशी संपर्क साधत आहेत, गोवा सरकारने आणलेले ॲप फेल करण्यासाठी उबेर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एका सेवेमध्ये १,५६० टॅक्सीचालक येतात, जीएसटी भरतात, त्यांची टीडीएस कापला जातो. राज्य सरकारला दहा कोटींवर महसूल दिला जातो.

एका आमदाराने सांगितल्याप्रमाणे जर १८ हजार जर टॅक्सी असतील, तर दिवसाला प्रत्येक टॅक्सी दोन भाडे मारते. २२०० रुपये कमावत असतील तर वर्षाला २५५ दिवसांत दोन फेऱ्यांनुसार १००९ कोटी रुपये जोडतील. त्यामुळे ही आकडेवारी पाहिली तर जी टॅक्सीचालकांची आकडेवारी सांगतात, ती चुकीची आहे, असेही माविन म्हणाले.

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: वाहतूकमंत्री गुदिन्हो यांनी पंचायत, वाहतूक व उद्योग खात्याच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना हा प्रस्ताव मांडला होता
Goa Assembly Monsoon Session: माविन यांच्याकडून पुन्हा गोवा माईल्स समर्थन, टॅक्सी चालकांनी अ‍ॅपवर येण्याबाबत भाष्य

‘गोवा माईल्स’चे सर्वांकडून कौतुक

माविन गुदिन्हो म्हणाले की, पंचायत आणि वाहतूक खाते पूर्णपणे कोसळले आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील या सरकारच्या या दोन्ही खात्यांनी अत्यंत उत्तम काम केले आहे. सरकारने ॲप बेस टॅक्सी सेवा सुरू केल्याने सर्वांकडून कौतुक करणारे फोन आले. गोवा माईल्स २० टक्के दराने कमी दर दिला आहे, तो व्यावसायिक सेवा ती अधिसूचित केली आहे.

टॅक्सीचालक राजदूत

गोवा लहान राज्य आहे, केंद्राचा पाठिंबा आहे पण तेथेही नियमातच निधी दिला जातो. टॅक्सीचालकांना आपला विरोध नाही, ते राज्याचे राजदूत आहेत. परंतु पर्यटकांवर त्यांचा पहिला प्रभाव पडतो. त्यामुळे टॅक्सीचालकांविषयी ते काय म्हणतात, ते पाहायला हवे. टॅक्सी सेवेत शिस्त यायला हवी यासाठी मुख्यमंत्री, तसेच टॅक्सीचालकांच्या मतदारसंघातील आमदारांशी बसून हा विषय सोडविला जावा, असेही गुदिन्हो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com