Nilesh Cabral  Dainik Gomantak
गोवा

वेळेत कामे होत नसल्यास मंत्रिपद सोडणार : काब्राल

काब्राल यांची तयारी : कामांना होणाऱ्या दिरंगाईवर नाराज

दैनिक गोमन्तक

मडगाव : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंजूर झालेल्या कामांना वित्त खात्याकडून मंजुरी मिळण्यास जो उशीर होतो त्यावर खुद्द मंत्री नीलेश काब्राल यांनीच नाराजी व्यक्त केली आहे. अशी दिरंगाई सुरू राहिल्यास आपल्याला हे खातेच नको, असे त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सांगितले आहे.

साकोर्डा येथे बांधलेल्या स्मशानभूमीचे उद्‍घाटन करताना सोमवारी त्यांनी ही नाराजी जाहीररीत्या व्यक्त केली. ते म्हणाले, सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे जी कामे हातात घेतली जातात ती वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. मात्र खात्यातील प्रशासकीय पद्धतीमुळे ती रेंगाळत आहेत. ही पद्धतच बदलण्याची गरज काब्राल यांनी व्यक्त केली.

प्रशासकीय पद्धत अत्यंत किचकट असून, ती त्वरित बदलून सोपी सुटसुटीत पद्धत सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. माझ्या खात्यातील कामे मला पाहिजे त्या प्रमाणे करता येत नसतील तर मी या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार आहे, असे मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे, असे काब्राल म्हणाले.

लोकांची नाराजी नकोय..!

सध्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामाच्या फाईली मंजुरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयात पाठवल्या जातात. या कार्यपद्धतीवर काब्राल यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ही कामे हातात घेण्याचे ठरविल्यानंतर लेखापालाकडून त्यांच्या खर्चाचा तपशील तयार केला जातो. तरीही या फाईली पुन्हा मंजुरीसाठी पाठविल्या जातात. तिथून ती फाईल मंजूर होऊन येईपर्यंत बराच वेळ जातो. त्यामुळे कामे वेळेत पूर्ण होत नाहीत आणि लोकांची नाराजी ओढवून घ्यावी लागते ती आपल्याला नको असल्याचे मंत्री काब्राल म्हणाले.

साकोर्ड्यात अद्ययावत स्मशानभूमी

साकोर्डा येथे सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे 52 लाख रुपये खर्च करून बांधलेल्या अद्ययावत स्मशानभूमीचे लोकार्पण झाले. स्मशानभूमीच्या देखरेखीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. लोकार्पण कार्यक्रमाला मंत्री नीलेश काब्राल, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर, धारबांदोड्याच्या जिल्हा पंचायत सदस्या सुधा गावकर, सरपंच उज्ज्वला गावकर, उपसरपंच नेहा कालेकर, पंच शिरीष देसाई, गौतम सावंत, विंदा सावंत, मोले सरपंच तन्वी केरकर, साकोर्डा महादेव देवस्थानचे अध्यक्ष गोपाळ नाडकर्णी, कार्यकारी अभियंता सुधीर परब उपस्थित होते. कार्यक्रमात कार्यकारी अभियंता परब, सहाय्यक अभियंता डेस्मंड कार्दोज व कंत्राटदार संदीप खांडेपारकर यांचा गौरव करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लिव्ह-इन पार्टनर परतली नवऱ्याकडे, प्रियकराची याचिका फेटाळत कोर्टानं झापलं; म्हणाले, 'अशा नात्यांना कायद्याचं कवच देता येणार नाही'

पाकिस्तानात प्रेम, लग्न अन् भारतात राहून हेरगिरी, एनआयएने जफर रियाजला ठोकल्या बेड्या; आयएसआयचा निघाला हस्तक

Goa Luthra Case: लुथरांच्या जामिनाला सरकारकडून आव्हान; बर्चप्रकरणी खंडपीठात धाव: अजय गुप्तालाही नोटीस, 15 रोजी सुनावणी

Hamza Burhan killed: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड 'हमजा बुरहान' ठार; मुझफ्फराबादमध्ये अज्ञात हल्लेखोरानं गोळ्या झाडून संपवलं

Pharmacy Strike: इस्‍पितळे वगळता इतर फार्मसी दिवसभर होत्या बंद; 'AIOCD'च्‍या देशव्‍यापी आंदोलनाला गोव्‍यातूनही उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT