Goa mining Dainik Gomantak
गोवा

पैरा-मये खाणीवर रात्रीचे ‘कारनामे’!

बेकायदा उत्‍खनन: मध्यरात्रीच होतेय खनिज वाहतूक; ग्रामस्थांचा आरोप

दैनिक गोमन्तक

डिचोली: ई-लिलाव खनिज वाहतुकीचा प्रश्न तापल्यानंतर पैरा-मये येथील खाणीवर रात्रीच्या वेळी बेकायदा कारनामे सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या खाणीवर बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन करण्यात

येत असून, मध्यरात्री लोक गाढ झोपेत असताना खनिज वाहतूक करण्यात येत आहे, असा दावा मयेतील काही जागृत नागरिकांनी केला आहे. बेकायदा खनिज उत्खनन करून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक करणे म्हणजे सरकारचा महसूल बुडविणे होय, असा आरोपही नागरिकांनी केला आहे. पैरा-मये येथील खाणीवर आज मंगळवारी सायंकाळी काही जागृत नागरिकांनी जाऊन पाहणी केली असता, तेथे यंत्रसामग्री, खनिज वाहतूक करणारे ट्रक आणि खनिज उत्खनन केल्याच्या खाणाखुणा आढळून आल्या.

..तर पुन्‍हा रस्‍त्‍यावर उतरावे लागेल!

ई-लिलावाच्या खनिज वाहतुकीवरून काही दिवसांपूर्वी मये गावात वातावरण तापले होते. गावातून नियमबाह्य खनिज वाहतूक होत असल्याचा आरोप करून किमान पाच ते सहावेळा नागरिकांनी रस्त्यावर उतरून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला होता. आता रात्रीच्या वेळी खनिज उत्खनन करून त्याची रात्रीच वाहतूक करण्यात येत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. सरकारने वेळीच हा प्रकार रोखला नाही तर या बेकायदेशीर कृत्याविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरणे भाग पडेल, असा इशारा काही नागरिकांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT