Crime News Dainik Gomantak
गोवा

8.50 लाखांच्या ड्रग्जसह नाजेरियन तर 91,500 रुपयांच्या गांजासह युपीच्या व्यक्तीला अटक, शिवोली आणि झुआरीनगरमध्ये कारवाई

Goa Drug Case: गुन्हे शाखा आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोघांना अटक केली आहे.

Pramod Yadav

पणजी: गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन मोठ्या कारवाई केल्या आहेत. साडेआठ लाख रुपयांच्या अमली पदार्थासह नाजेरियन व्यक्ती तर ९१,५०० रुपयांंच्या गांजासह उत्तर प्रदेशातील व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अनुक्रमे शिवोली आणि झुआरीनगर येथे ही कारवाई करण्यात आली.

नायजेरियन व्यक्तीला अटक

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत शिवोलीत नाजेरियन व्यक्तीला अटक करण्यात आली. इजाशी कॅलिसतस (३८, रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडे साडे आठ लाख रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ आढळून आले आहेत.

इजाशी वाडो मारणा, शिवोली येथे वास्तव्यास होता. पोलिसांनी त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे अमली जप्त केले आहेत.

मेथापेटामाईन - 4.485 ग्रॅम

एमडीएमए - 2.294 ग्रॅम आणि,

कोकेण - 35.593 ग्रॅम

उत्तर प्रदेशच्या व्यक्तीला अटक

अमली पदार्थ विरोधी पथकाने झुआरीनगरमध्ये गोरखपूर, उत्तर प्रदेश येथील नागरिकाला अटक केली. त्याच्याकडे ९०५ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला आहे. बाजारातील याची किंमत ९१,५०० रुपये इतकी आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाची झुआरीनगरमधील ही तिसरी कारवाई आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

SCROLL FOR NEXT