Goa NH 66 Landslide Dainik Gomantak
गोवा

Landslide In Goa: पुन्‍हा दरड कोसळली! राष्ट्रीय महामार्ग बंद

National Highway 66: दुसऱ्यांदा मोठी दरड कोसळून महामार्ग पूर्णत: बंद झाला

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे तालुक्‍यातील न्‍हयबाग-मालपे येथील राष्ट्रीय महामार्ग ६६ वर आज (मंगळवारी) सकाळी दुसऱ्यांदा मोठी दरड कोसळून महामार्ग पूर्णत: बंद झाला. त्‍यामुळे या मार्गावरील वाहतूक जुन्या रस्त्यानेच वळविण्यात आली आहे.

मालपे व न्‍हयबाग या दोन्ही बाजूंनी मोठ्या चढणी आहेत. वाहनांना विशेषत: अवजड वाहनांना त्या त्रासदायक ठरतात. तसेच नागमोडी रस्त्याचे अंतर कमी करण्यासाठी हा चौपदरी बगलमार्ग निर्माण करण्यात आला आहे.

या महामार्गाचे कंत्राट एमव्हीआर इन्फ्रा प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे. सुमारे अडीच ते तीन किलोमीटर अंतराचा नवीन बगलमार्ग बांधण्यात आला. मार्च-एप्रिलमध्ये हा रस्ता वाहतुकीसाठी खुलाही करण्यात आला. या नवीन मार्गामुळे दोन्ही बाजूंच्‍या चढावामुळे होणारे त्रास वाचले, तसेच पूर्वीच्या रस्त्यापेक्षा सुमारे दोन किलोमीटर अंतर कमी झाले.

पण या नवीन बगलमार्गासाठी दोन्ही बाजूंनी कापलेले डोंगर थेट उभे कापले आहेत. ते निमुळते कापणे गरजेचे होते. पण तसे न झाल्‍याने येथे दरडी कोसळण्‍याचे सत्र सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT