Court Dainik Gomantak
गोवा

New Borim Bridge: नवीन बोरी पुलासंदर्भात हरित लवादातील सुनावणी 7 जानेवारीला; शेतकरी आक्रमक, हायकोर्टात जाण्याची तयारी

National Green Tribunal: नवीन बोरी पुलासंदर्भात लोटली येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे भू संपादनाबाबत न्याय मिळवण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणी २ डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आली होती; पण लवादाने यावरील सुनावणी ७ जानेवारी २०२५ पर्यंत पुढे ढकलण्याचा आदेश जाहीर केला.

गोमन्तक डिजिटल टीम

New Borim Bridge Loutolim Farmers Hearing NGT

सासष्टी: नवीन बोरी पुलासंदर्भात लोटली येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे भू संपादनाबाबत न्याय मिळवण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणी २ डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आली होती; पण लवादाने यावरील सुनावणी ७ जानेवारी २०२५ पर्यंत पुढे ढकलण्याचा आदेश जाहीर केला.

याप्रकरणी गोवा सरकारी वकिलाने शेतकऱ्यांच्या अर्जावर स्पष्टीकरण देण्यास थोडा वेळ मागितला. दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर लवादाने सुनावणी पुढे ढकलली.

नवीन बोरी पुलासाठीच्या जमीन संपादन प्रक्रियेला स्थगिती द्यावी, असा अर्ज शेतकऱ्यांनी केला आहे. त्याचबरोबर सरकारने नवीन बोरी पुलाचा आराखडा बदलावा व पूर्वीच्या आराखड्याचा पुनर्विचार करून या पुलासाठी दुसरीकडून जमिनीची निवड करावी, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच ईआयए अधिसूचना २००६ अंतर्गत प्रथम पर्यावरण मंजुरी मिळविल्याशिवाय हा प्रकल्प पुढे नेऊ नये, अशीही शेतकऱ्यांची मागणी आहे.

आता शेतकऱ्यांनी यासंदर्भात कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी ते अर्ज करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य सरकार या प्रकरणात सध्या मुद्दामहून चालढकलीचा प्रकार करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रीय हरित लवाद २ रोजीच याप्रकरणी आपला आदेश देणार, असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र, लवादाने सुनावणी पुढे ढकलल्याने शेतकरी निराश झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

SCROLL FOR NEXT