Goa Temperature Dainik Gomantak
गोवा

Goa Temperature: गोव्यात आगामी 4 दिवस आणखी 'हॉट'; तापमानात होणार 'इतक्या' अंशाची वाढ...

ऐन फेब्रुवारीतच वैशाख वणव्याचा अनुभव

Akshay Nirmale

Goa Temperature: अद्याप वसंत ऋतुला सुरूवात व्हायला अवधी असताना त्यापुर्वीच गोव्यातील तापमानाचा पारा चाळीशीकडे सरकू लागला आहे. या आधीच फेब्रुवारीतील सर्वाधिक तापमानाचा विक्रम गोव्यात नोंदवला गेला असून आता आगामी चार दिवस तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती, भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे.

राज्यात पुढील चार दिवस कमाल तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 34 अंशांच्या आसपास आहे. हे तापमानही सामान्य तापमानापेक्षा काही अंशांनी जास्तच आहे.

परंतु पुढील चार दिवस कमाल तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ होऊ शकते,” असे भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञ राजश्री व्ही. पी. एम. यांनी सांगितले आहे.

फेब्रुवारीच्या मध्यात तापमानाचा पारा सामान्यपेक्षा चार ते पाच अंशांनी वाढल्यानंतर त्यात पुन्हा घट झाली आणि तापमान सामान्य स्तरावर आले. 16 फेब्रुवारी रोजी, पणजीमध्ये 38.2 अंश सेल्सियस कमाल तापमान नोंदवले गेले, जे गेल्या दशकभरात किंवा त्याहून अधिक काळातील फेब्रुवारीतील सर्वाधिक जास्त तापमान आहे.

त्या दिवशी गुजरातच्या भूजमध्ये तापमान 40.3 अंश सेल्सिअस होते. तर गोव्यातील तापमान देशात पाचव्या क्रमांकाचे जास्त तापमान होते.

त्या आठवड्यात, पणजीमध्ये 13 फेब्रुवारीला कमाल तापमान 37.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आणि 15 फेब्रुवारीला 34.5 सेल्सिअस आणि 17 फेब्रुवारीला 35.8 सेल्सिअस वगळता पारा आणखी दोन दिवस 37.9 अंशांवर राहिला. सापेक्ष आर्द्रता सुमारे 20% होती, हे प्रमाणदेखील जास्त आहे.

तेव्हापासून आर्द्रता वाढली असताना, दिवसाचे तापमान 34 अंशांच्या आसपास आहे. आगामी काळात पूर्वेकडील वाऱ्यांमुळे पुढील चार दिवसांत त्यात एक किंवा दोन अंशांनी चढ-उतार होऊ शकतात, ज्यामुळे उष्णता किंचित वाढेल.

गोव्यात याच महिन्यात 13 फेब्रुवारी रोजी तापमानाचा पारा 37.9 डिग्री सेल्सिअसवर पोहोचला होता. हे तापमान त्या दिवशीचे देशातील सर्वाधिक तापमान होते. दरम्यान, गोव्यात 16 फेब्रुवारी रोजी 38.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंदणी झाली होती.

ही फेब्रुवारीतील आतापर्यंतच्या तापमानातली सर्वाधिक विक्रमी नोंद आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्वेकडून जमिनीवरून येणारे वारे तापमान वाढीस कारणीभूत ठरते. अर्थात याला समुद्रावरून येणारे वारे उशिरा वहायला सुरू होणे हेही कारण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपला तिसऱ्या आघाडीची भीती नाही! दामू नाईकांचा विरोधकांना टोला; '2027 मध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येणार'

Goa Congress: काँग्रेसची 'गोवा राखण यात्रा' 22 सप्टेंबरपासून! 27 दिवसांत सर्व 40 मतदारसंघांचा दौरा; जमीन, पर्यावरण आणि अस्मितेसाठी लढ्याची घोषणा

Guru Mangal Yuti 2026: 18 सप्टेंबरला महाचमत्कार! गुरु-सेनापती युतीनं चमकणार 4 राशींचं नशीब; हाती लागणार कुबेराचा खजिना

खरी कुजबुज: युरीवर भरोसा नाही काय?

Goa Politics:गोवा फॉरवर्डला 'आप'चा हात? केजरीवालांच्या 'मोठ्या घोषणे’कडे लक्ष; 2027 साठी नव्या राजकीय समीकरणाची नांदी

SCROLL FOR NEXT