Pernem Illegal Construction Dainik Gomantak
गोवा

Warkhand Panchayat: बेकायदा बांधकामावर पंचायतीचा दणका, वारखंडमधील प्रकार; नोटीस, पंचनामा आणि पाहणीची प्रक्रिया सुरू

Pernem Illegal Construction: पेडणे तालुक्यातील वारखंड-नागझर पंचायत क्षेत्रातील बेकायदा बांधकाम प्रकरणावरून सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मोरजी: पेडणे तालुक्यातील वारखंड-नागझर पंचायत क्षेत्रातील बेकायदा बांधकाम प्रकरणावरून सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे. संबंधित प्रकरणात पंचायत प्रशासनाने नियमानुसार प्रक्रिया सुरू करत संबंधितांना ‘स्टॉप वर्क नोटीस’ बजावल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

देऊळवाडा-वारखंड येथील चंद्रकांत जगन्नाथ परब यांनी २५ रोजी वारखंड-नागझर ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत सर्व्हे क्रमांक १९०/२ मधील मालमत्तेवर आवश्यक परवानगीशिवाय बांधकाम सुरू असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच संबंधितांना कोणतीही एनओसी, वीज किंवा पाणी जोडणी देऊ नये, अशी मागणीही करण्यात आली होती.

तक्रारीची दखल घेत पंचायत प्रशासनाने गोवा पंचायत राज कायदा १९९४ च्या कलम ६४ अंतर्गत संबंधित व्यक्तीला ‘स्टॉप वर्क नोटीस’ जारी केली. नोटिशीत बांधकाम तात्काळ थांबवून तीन दिवसांत संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, आदेशाचे पालन न केल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

पंचायत प्रशासनाने स्थळ पाहणी व पंचनामा करण्यासाठी २६ मे रोजी उपस्थित राहण्याची नोटीस संबंधित पक्षांना पाठवली आहे. तक्रारदार, संबंधित व्यक्ती, पंचायत सदस्य आणि अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिशाभूल करणारी माहिती!

पंचायत प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात असला तरी प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू असल्याचे उपलब्ध कागदपत्रांतून स्पष्ट होत आहे. सरपंच गौरी जोसलकर यांनी प्रकरणात आधीच आवश्यक नोटीस बजावण्यात आल्याचे सांगत काहीजण दिशाभूल करणारी माहिती पसरवत असल्याचा आरोप केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT