Goa authorities enforce fishing restrictions at Cutbona Jetty Dainik Gomantak
गोवा

Goa Fishing Ban: कुटबण जेटीवर मासेमारी बंदीबाबत कडक नियम; बोटी-जाळ्यांवर निर्बंध, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

Goa Monsoon Fishing Restrictions: गोव्यात १ जून ते ३१ जुलै अशी ६१ दिवसांची मासेमारी बंदी जाहीर करण्यात आली असून या काळात कुटबण येथील नवीन जेटीवर लहान बोटी व जाळी ठेवण्यास मत्स्यव्यवसाय खात्याने बंदी घातली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सासष्टी: गोव्यात १ जून ते ३१ जुलै अशी ६१ दिवसांची मासेमारी बंदी जाहीर करण्यात आली असून या काळात कुटबण येथील नवीन जेटीवर लहान बोटी व जाळी ठेवण्यास मत्स्यव्यवसाय खात्याने बंदी घातली आहे. जेटीचा दुरुपयोग होऊ नये यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.

बंदी कालावधीत जेटीवर बोटी, जाळी व इतर मासेमारी साहित्य ठेवू नये, अशी स्पष्ट सूचना बोटमालकांना देण्यात आली आहे. कुटबण जेटी व्यवस्थापन समितीनेही पर्यायी जागेची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागील वर्षी बंदीनंतरही बोटी जेटीवरच राहिल्याने समस्या निर्माण झाली होती, त्यामुळे यंदा अधिक कडक अंमलबजावणी केली जात आहे.

दरम्यान, २०२४ मध्ये याच परिसरात कॉलरामुळे पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य व स्वच्छतेबाबत विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

जेटीची स्वच्छता राखण्याचा निर्धार

सध्या जेटीवर असलेल्या लहान बोटी व जाळ्या हटविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आवश्यकतेनुसार जाळी उतरवून त्वरित हटवावीत, असे आदेश दिले आहेत. सुमारे ३०० ट्रॉलरची नोंद असलेल्या या जेटीची स्वच्छता राखण्याचा निर्धार मत्स्यव्यवसाय खात्याने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT