Goa Apartment Fire Dainik Gomantak
गोवा

Bicholim Fire: डिचोलीत भरदिवसा फ्लॅटला आग; जीवितहानी टळली, दागिन्यांसह पंधरा लाखांचा ऐवज भस्मसात

Goa Apartment Fire: बोर्डे-डिचोली येथील एका फ्लॅटला भरदिवसा आग लागून सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून लाखो रुपयांचा ऐवज भस्मसात झाला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: बोर्डे-डिचोली येथील एका फ्लॅटला भरदिवसा आग लागून सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून लाखो रुपयांचा ऐवज भस्मसात झाला. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला ऐवज १५ लाखांच्या घरात असल्याची माहिती मिळाली आहे. ‘सिया कॉम्प्लेक्स’मधील पहिल्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटला आग लागली. आगीची ही घटना शनिवारी (ता.२३) सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

आग लागली त्यावेळी फ्लॅटमध्ये कोणीच नव्हते. त्यामुळे जीवितहानीसारखा अनर्थ टळला. आग नियंत्रणात येईपर्यंत देवघर असलेली फ्लॅटमधील एक खोली आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला दोन बंबांचा वापर करावा लागला. आग नेमकी कशी लागली, त्याचा उलगडा झालेला नाही. मात्र, देवघरातील निरंजनामधील पेटत्या वातीमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक कयास आहे.

दरम्यान, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीची पाहणी केली. या घटनेत आपत्ती ओढवलेल्या संतोष सुतार यांना आमदारांनी धीर दिला.

कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने वितळले

आग लागलेल्या फ्लॅटमध्ये संतोष सुतार हे आपल्या बायको-मुलांसह भाड्याने राहतात. नेहमीप्रमाणे संतोष आणि त्यांची पत्नी फ्लॅट बंद करून कामाला गेले होते. तर मुलेही बाहेर होती. सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्यान फ्लॅटमधून धूर बाहेर येत असल्याचे निदर्शनास येताच, शेजाऱ्यांनी संतोष सुतार यांच्याशी फोनद्वारे संपर्क करून घटनेची माहिती दिली.

लागलीच डिचोलीच्या अग्निशमन दलाला कळविताच डिचोली अग्निशमन दलाचे उपअधिकारी एस.के. नाईक आणि राजन परब यांच्या नेतृत्वाखाली दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत फ्लॅटमधील एका खोलीत आगीचा भडाका उडाला होता. या आगीत कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने वितळून गेले. तसेच रोख एक लाख रुपयांसह लॅपटॉप आदी किमती ऐवज जळून भस्मसात झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT