Rising crime against women in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: दहा महिन्यांत तीन महिलांचा खून! बालिकेचीही हत्या, डिचोलीत महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह

Goa Women Safety : कुडणे-साखळी येथील महिलेची हत्येसह डिचोली पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात गेल्या दहा महिन्यांत तीन महिलांचे निर्दयीपणे खून करण्याच्या घटना घडल्या आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: कुडणे-साखळी येथील महिलेची हत्येसह डिचोली पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात गेल्या दहा महिन्यांत तीन महिलांचे निर्दयीपणे खून करण्याच्या घटना घडल्या आहेत, तर एका तीन वर्षीय चिमुरडीची हत्या करण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. याशिवाय एका महिलेच्या मृत्यूबाबत अजूनही गूढ कायम आहे. या खून प्रकरणांमुळे डिचोलीत खळबळ माजली असून महिलांच्या सुरक्षितेबाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

समाधानाची बाब म्हणजे या खून प्रकरणांचा छडा लावण्यात डिचोली पोलिसांना यश आले आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच गेल्या मंगळवारी (ता. १९) चिकणे - साखळी येथे शैला संजय घाडी या ५७ वर्षीय महिलेचा खून करण्याचा प्रकार समोर आला आहे. या खूनप्रकरणी डिचोली पोलिसांनी कारवाई करून ठाणे-महाराष्ट्र येथून संशयित युवकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात भर डिचोली शहरात लक्ष्मी भिकाजी शिरोडकर (वय ५५) या महिलेचा खून करण्याचा प्रकार घडला होता.

या खूनप्रकरणी मृत लक्ष्मी हिचा साथीदार रमेश तेली याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या रमेश तेली कोलवाळ तुरुंगात आहे. तत्पूर्वी गेल्यावर्षी जुलै महिन्यात न्यूवाडा-वाठादेव येथे रबिया हवंगी या २५ वर्षीय विवाहित महिलेची दिवसाढवळ्या निर्दयीपणे हत्या करण्याची घटना घडली होती. पती मैनुद्दीन हवंगी याने तलवारीचे सपासप वार करून रबिया हिचा खून केला होता. खुनाच्या घटनेनंतर शरण आलेल्या मैनुद्दीनला पोलिसांनी अटक केली आहे.

पोटच्या गोळ्याची हत्या

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्याच्या १५ तारखेला म्हावळींगे येथे घडलेल्या तीन वर्षीय चिमुकल्या मुलीच्या खून प्रकरणामुळे डिचोलीत प्रचंड खळबळ माजली होती. मुलीची तिच्या आईच्या मदतीने प्रियकराने अत्यंत निर्दयीपणे खून करण्याची घटना घडली होती. या खूनप्रकरणी ‘त्या’ दुर्दैवी चिमुकल्या मुलीची आई नागम्मा रवी व्ही आणि तिचा प्रियकर नितीशकुमार पुजारा यांच्यासह अन्य एका संशयिताला पोलिसांनी अटक केली. पोटच्या गोळ्याची अमानुषपणे हत्त्या करण्याच्या या प्रकारामुळे तर सर्वत्र खळबळ उडाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

Israel Crime: इस्त्रायलमध्ये भारतीय नागरिकाची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; 31 वर्षीय संशयिताला अटक

Mangal Gochar 2026: नोकरीत प्रमोशन अन् धनलाभाचे सुवर्ण योग! मृगशिरा नक्षत्रात मंगळाचे बली गोचर! ''या' राशींचे नशीब चमकणार

'CJP Protest' निर्णायक टप्प्यात! मोदी सरकारकडून तीनपैकी दोन मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शनिवारी निर्णय

SCROLL FOR NEXT