Bicholim Shop Fire Dainik Gomantak
गोवा

Bicholim Shop Fire: लॅपटॉप, संगणक अन् मशीन जळून राख; डिचोलीत ग्राफिक्सच्या दुकानाला भीषण आग, 'इतक्या' लाखांचे नुकसान

Bicholim News: डिचोली येथील मुस्लिमवाडा भागात शनिवारी रात्री उशिरा एका ग्राफिक्सच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Sameer Amunekar

डिचोली: डिचोली येथील मुस्लिमवाडा भागात शनिवारी रात्री उशिरा एका ग्राफिक्सच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत दुकानातील संगणक, लॅपटॉप आणि इतर महागडे साहित्य जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मध्यरात्री धुराचे लोट

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ११:३० च्या सुमारास स्थानिक रहिवाशांना मुस्लिमवाडा येथील ग्राफिक्सच्या दुकानातून धूर बाहेर येताना दिसला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिकांनी तत्काळ दुकान मालकाला याची कल्पना दिली. आग पसरू नये म्हणून परिसरातील तरुणांनी शेजारीच असलेल्या एका वॉशिंग सेंटरमधील पाण्याचा वापर करून आग विझवण्याचा शर्थीने प्रयत्न केला. नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधामुळे दुकानाशेजारी उभ्या असलेल्या कार सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

अग्निशमन दलाचा विलंब

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची वर्दी देऊनही अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला. अग्निशमन दल पोहोचेपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते आणि संपूर्ण दुकान आगीच्या विळख्यात सापडले होते. या आगीत दुकानातील लॅपटॉप, संगणक संच आणि ग्राफिक्ससाठी लागणारे प्रिंटिंग साहित्य असे मिळून अंदाजे ४.५ ते ५ लाख रुपयांची मालमत्ता जळून राख झाली आहे. वेळेत मदत मिळाली असती तर नुकसान टाळता आले असते, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक रियाज बेग यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी पीडित दुकानदाराचे सांत्वन केले आणि स्थानिक आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या माध्यमातून योग्य ती शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: शनिदेवाच्या कृपेने पालटणार भाग्य; वैशाखच्या पहिल्या शनिवारी 'या' 4 राशींना नोकरी-व्यवसायात मिळणार प्रचंड यश

Suryakumar Yadav Dance: सूर्याचा 'धुरंधर' अवतार! अक्षय खन्नाच्या 'सिग्नेचर' स्टेपवर धरला ठेका; धमाकेदार डान्सवर चाहते फिदा VIDEO

Iran War: इराणी ड्रोनचा अचूक वेध अन् कुवेतच्या स्वप्नांचा चुराडा! 'डिसॅलिनेशन प्लॅंट'वर केला भीषण हल्ला; 90 टक्के पाणीपुरवठा धोक्यात

Goa Crime: कुटुंबीयांकडून घाईघाईत अंत्यविधीची तयारी, पण... KTC बस स्थानक परिसरात खळबळ; झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

Leopard in Camurlim: कामुर्लीत बिबट्याचा वावर; वासराची शिकार केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT