Cricket Betting Racket Busted In Goa: पर्वरी पोलिसांनी बेकायदेशीर क्रिकेट बेटिंग रॅकेटवर छापा टाकला. या छाप्यात 12 संशयितांना अटक करण्यात आली तर 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
अटक करण्यात आलेले संशयित हे परप्रांतिय असून ‘गोवा दमण आणि दीव सार्वजनिक जुगार कायदा, 1976’ च्या कलम 2 आणि 4 अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.
पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंड विरुद्ध यूएई या टी-20 क्रिकेट सामन्यात लोकांकडून सट्टा स्वीकारून काही लोक बेकायदेशीर ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजी करत असल्याची गुप्त माहिती पर्वरी पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांच्या एका पथकाने पर्वरीतील हॉटेल मॅन्ट्रीमधील एका खोलीवर छापा टाकला. या छाप्यात 12 जणांना सट्टा घेताना रंगेहात पकडले.
तसेच त्यांच्याकडील बेटींगसाठी वापरले जाणारे 2 लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले. दहा मोबाईल, लॅपटॉप, वायफाय राउटर असा दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या छाप्यात संशयित संजय सुब्बा (नवी दिल्ली), करण राजेश पाटील (अकोला, महाराष्ट्र), नवीन बत्रा (रायपूर, छत्तीसगड), वरिंदर सिंग (बिलासपूर, छत्तीसगड), अमित मोरे (अकोला, महाराष्ट्र), अंकित कुमार (धनबाद, झारखंड), सूरज नागदेव (उत्तर रायपूर, छत्तीसगड), किशन पोपटानी (रायपूर, छत्तीसगड), तिलेश कुमार कुरे (राकजा शक्ती, छत्तीसगड), श्रेय शर्मा (रायपूर, छत्तीसगड), आशिष मंत्री (जयपूर, राजस्थान), रितेश जैस्वाल (पश्चिम दिल्ली) यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई पर्वरी पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक सचिन यादव (आयपीएस), विकास स्वामी (आयपीएस), सीताराम मलीक (पीएसआय), पोलीस उपनिरीक्षक प्रतीक भटप्रभू, कॉन्स्टेबल योगेश शिंदे, महादेव नाईक, उत्कर्ष देसाई आणि नितेश गावडे यांच्या पथकाने केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.