Shooting At Dongri Tiswadi: डोंगरी तिसवाडी येथे अंत्यविधीवेळी गोळीबार, मयताचा भाऊ थोडक्यात बचावला

स्मशानभूमी जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती
Shooting At Dongari Tiswadi
Shooting At Dongari Tiswadi Dainik Gomantak
Published on
Updated on

Shooting At Dongari Tiswadi: डोंगरी तिसवाडी येथे अंत्यविधीवेळी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्मशानभूमी जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या गोळीबारात मयताचा भाऊ थोडक्यात बचावला आहे.

गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी घटनास्थळावरून तात्काळ अटक केली असून, पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

गणपत वेंगुर्लेकर यांच्यावर डोंगरी-तिसवाडी येथे अंत्यविधी सुरू होता. यावेळी संशयित पीटर जासिंत वाझ याने अंत्यविधीसाठी आलेल्या कुटुंबीयांवर गोळीबार केला. गोळीबारात वेंगुर्लेकर यांचा भाऊ थोडक्यात बचावला.

पोलिसांनी तात्काळ संशयित पीटर वाझ याला ताब्यात घेऊन, पिस्तुल जप्त केले.

गणपत वेंगुर्लेकर यांच्या अंत्यविधीसाठी डोंगरी येथील स्मशानभूमीत साफसफाई सुरू होती. यावेळी वाझ याने तेथे येऊन कुटुंबीयांशी वाद घातला. वादानंतर चिडलेल्या वाझने येथे जमलेल्या लोकांवर गोळीबार केला. गोळीबारात मयत गणपत यांचा भाव सुदैवाने बचावला. आगशी पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa murder case conditional bail after 4 years
Goa Crime Branch Investigation
Soham Naik Bail Application
Iran Seizes Two Ships 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com