Goa Banastarim Mercedes accident: बाणस्तारी येथे झालेल्या अपघातात तीन जणांचा बळी गेला तर गंभीर जखमी झालेल्या तिघांवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
या अपघातात जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिक शंकर हळर्णकर यांच्यावर मागील दहा दिवसांत दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. 'ते पुन्हा व्यवस्थित चालू शकतील अशी आशा आहे', अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांच्या पत्नी शीतल हळर्णकर यांनी दिली आहे.
सुतारकाम करणारे शंकर हळर्णकर (वय 66) यांना गंभीर दुखापत झाली आहे. हळर्णकर अपघातानंतर चारचाकी वाहनातच अडकून पडले होते. त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा एक हात आणि पाय निष्क्रिय झाला आहे.
मागील दहा दिवसांत त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांना अतिदक्षता विभागातून (ICU) रुग्णालयात हलवण्यात आले होते.
त्यांना हातपाय हालवता येत नाहीत. कोणाचीतरी मदत घेतल्याशिवाय त्यांना बेडवरून उठता येत नाहीये. त्यांना अर्धांगवायूचा त्रास होऊ शकतो अशी शंका डॉक्टरांनी उपस्थित केली आहे. ते खूप तंदुरुस्त आणि आरोग्य जपणारे होते पण सध्या अंथरुणाला खिळलेले आहेत. असे डोळ्यातील अश्रु पुसत शीतल म्हणाल्या.
शंकर हळर्णकर अजूनही नीट बोलू शकत नाहीत. मी ड्रायव्हर शेजारी बसलो होतो त्यानंतर ती अपघाताची घटना घडली आणि डोळे उघडले तेव्हा मी रूग्णालयात होतो. असे त्यांनी अडखळत बोलताना सांगितले.
हळर्णकर वास्को बंदरातील शिपयार्डमध्ये सुतारकाम करत होते. 2018 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर, विविध कामं करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
मी गृहिणी आहे आणि मी देखील विविध आजारांनी त्रस्त आहे. सरकार आम्हाला काही मदत करेल. अशी आशा शीतल यांनी व्यक्त केली. तर, अपघातातील दोषींना योग्य शिक्षा मिळायला हवी असे त्यांचा मुलगा सिताराम याने म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.