Ratnagiri Crime Dainik Gomantak
गोवा

Ratnagiri Crime: स्वप्न, मृतदेह! खेड, रत्नागिरी प्रकरणात नवा ट्विस्ट; आर्याचा भोस्ते घाटात होता वावर

Khed-Ratnagiri Crime: घटनेचे गूढ उलघडत नसल्याने खेड पोलिसांनी योगेश आर्या याची कसून चोकशी करण्यास सुरुवात केली.

Pramod Yadav

Khed-Ratnagiri Crime

रत्नागिरी: सिंधुदुर्गातील एका तरुणाने स्वप्नात मृतदेह दिसत असल्याचा दावा केला, खेड - रत्नागिरी पोलिसांत त्यांने माहिती दिल्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृतदेह आढळून आला.

स्वप्नात दिसलेल्या मृतदेहाचे गूढ गेल्या काही दिवसांपासून उलघडत नसताना आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे.

योगेश आर्या याने खेड पोलिसांत जात त्याला स्वप्नात मृतदेह दिसत असल्याचा दावा केला. मुंबई गोवा महामार्गाजवळील भोस्ते घाटात जंगल परिसरात मृतदेह असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तरुणाच्या दाव्यावर विश्वास ठेवत घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या ठिकाणी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील एक मृतदेह आणि कवटी आढळून आली.

स्वप्नातील दावा खरा ठरल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले. तसेच, ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत देखील संभ्रम उपस्थित करण्यात आले. पोलिसांनी मृतदेहाचे नमुने तपासणीसाठी मिरज येथे पाठवण्यात आले आहेत.

घटनेचे गूढ उलघडत नसल्याने खेड पोलिसांनी योगेश आर्या याची कसून चोकशी करण्यास सुरुवात केली. चौकशीत योगेशने महत्वाचा खुलासा केला आहे.

योगेश आर्या हा मूळचा बिहारचा रहिवाशी असून तो सिंधुदुर्ग येथे वास्तव्यास आहे. गेल्या १० सप्टेंबरपासून तो खेड परिसरात एकटाच फिरत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो भोस्ते घाटातील जंगल परिसरासह या भागात वावरत होता. त्यामुळे एवढे दिवस तो या भागात काय करत होता? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, योगेश आर्याने सावंतवाडीसह गोव्यात देखील विविध ठिकाणी नोकरी केली आहे. बरेच दिवस तो खेड तालुक्यात फिरत होता. त्याचे मानसिक स्वास्थ बिघडल्यासारखे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

जंगलात सापडलेल्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. तरी कुजलेल्या अवस्थेत सापडलेला हा मृतदेह तीन महिन्यापूर्वीचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच, पोलिस सावंतवाडी ते गोव्यातून बेपत्ता झालेल्या नागरिकांची माहिती देखील घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT