While Inspecting The Planned Site Of Tambdi Surla Tourism Project  Gomantak Digital Team
गोवा

Goa Tourism : तांबडी सुर्ल येथे पर्यटकांच्‍या सोयीसाठी 7 कोटींचा प्रकल्प

आराखडा तयार : महादेव मंदिर व निसर्गरम्‍य परिसर गजबजणार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tourism : तांबडी-सुर्ल, साकोर्डा येथील श्री महादेव मंदिर आणि तेथील निसर्गरम्‍य परिसरात येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांच्या सोयीसाठी 7 कोटी रुपये खर्चून नवीन प्रकल्प आकारास येत आहे. त्याचा आराखडा तयार आहे.

त्यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाकडे 33 वर्षांसाठी जमिनीचा कायदेशीर करार करण्यात आल्‍याची माहिती मालक गौरेश नाईक यांनी नियोजित जमिनीची पाहणी केल्यावर दिली.

यावेळी सरपंच प्रिया खांडेपारकर, स्थानिक पंच संजना नार्वेकर, सचिव भूषण तावडे, शशिकांत ओडकर उपस्थित होते.

मंदिराच्या परिसरात पिण्याच्‍या पाण्‍याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकाराच्या पर्यटकांसाठी साधनसुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटक मंदिराला भेट देऊन निघून जातात.

मात्र आता येथे साकार होणार असलेला प्रकल्प पर्यटकांसाठी वरदान ठरणार आहे. त्या दृष्टीने प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रारंभी प्रकल्पात दहा झोपड्या (कॉटेज्) व एका पोहण्याच्‍या कृत्रिम तलावाचा समावेश असेल.

प्रकल्प पूर्ण झाल्यावर 40-50 स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे नाईक म्‍हणाले.

गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या जागेत एक जुनी इमारत आहे. ती मोडकळीस आल्‍याचे दिसते. या इमारतीचा पाया मजबूत आहे की नाही, याबाबत तज्‍ज्ञांचा सल्ला घेऊन पुढे काय तो निर्णय घेण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या नियोजित जागेत लहान-मोठी झाडे आहेत.

त्यांची अजिबात काटछाट न करता प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात येईल. पणजीतील ‘स्मार्ट सिटी’चे काम पूर्ण झाल्यावर सदर प्रकल्पाच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे, असे गौरेश नाईक यांनी सांगितले.

तांबडी-सुर्ला येथे साकारत असलेला प्रकल्प पर्यटकांसाठी वरदान ठरणार आहे. त्या दृष्टीने प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

प्रारंभी प्रकल्पात दहा झोपड्या (कॉटेज) व एका पोहण्याच्‍या कृत्रिम तलावाचा समावेश असेल. प्रकल्प पूर्ण झाल्यावर40-50 स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

- गौरेश नाईक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Super League: 'आयएसएल' पंचगिरीबाबत FC Goa नाराज, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे लेखी तक्रार; तीव्र चिंता व्यक्त

Ducati ची दमदार अ‍ॅडव्हेंचर बाईक भारतात येणार! बुकिंग सुरू, 890cc इंजिनसह मिळणार भन्नाट फीचर्स; Royal Enfield-KTM ला देणार टक्कर, किंमत किती?

डिचोलीत दिवाळीचा उत्साह शिगेला! नरकासुर प्रतिमांनी वेधलं लक्ष; बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी

Viral Video: ट्रेनमध्ये चोरी करायला गेला अन् स्वतःच अडकला! खिडकीतून हात घालताच प्रवाशांनी चोराला पकडलं; 94 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

Accident Death: तन्मयची दिवाळी ठरली अखेरची! डिचोलीत भीषण अपघातात 22 वर्षीय युवकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT