Bureau of Narcotics Control Dainik Gomantak
गोवा

NCB: सावधान! गोव्यात अंमली पदार्थांच्या तस्करीवर आता करडी नजर; स्वतंत्र ‘नार्कोटिक्स’ कार्यालय सुरू

NCB Goa: दिल्लीत कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने गोवा राज्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो या सरकारी यंत्रणेचे गोव्यातील कार्यालय मुंबई विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत काम करत होते तर आता गोव्यासाठी स्वतंत्र विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Gets Dedicated Narcotics Control Bureau Office

पणजी: दिल्लीत कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने गोवा राज्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो या सरकारी यंत्रणेचे गोव्यातील कार्यालय मुंबई विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत काम करत होते तर आता गोव्यासाठी स्वतंत्र विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

या कार्यालयाच्या क्षेत्रात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील दोन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ तस्करीत परदेशी नागरिकांच्या सहभागाने सरकारी यंत्रणांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

परदेशातून अमली पदार्थ तस्करीसाठी कुरिअर सेवा वापरली जात असल्याचे समोर आले आहे. याचा शोध घेण्यासाठी एनसीबी अधिकाऱ्यांनी गेल्या बुधवारी कुरिअर सेवांच्या प्रतिनिधींसोबत याबाबत बैठक घेतली होती. एनसीबीने गेल्या दोन वर्षांत २१ प्रकरणांमध्ये ४७ जणांना अटक केली आहे, त्यात ३४ भारतीयांचा समावेश आहे.

हैदराबादमधील अटक आणि त्यानंतरच्या चौकशीदरम्यान, गोव्यातून अमली पदार्थ हैदराबादमध्ये पाठवले जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. हैदराबाद नार्कोटिक्स एनफोर्समेंट विंगच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती तेथील माध्यमांना दिली आहे. गोव्यात अमली पदार्थ थांबवणे आमच्या अधिकारात नाही; परंतु हैदराबादमध्ये अमली पदार्थ रोखण्याचे आमचे कर्तव्य आहे, असे त्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

Goa Rain Water Harvesting: 47 सरकारी शाळांतच 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'! राज्यातील 7 टक्के शाळांकडून सरकारी धोरणाला प्रतिसाद

Goa politics: 'NDZ'ला विरोध कशासाठी? दिल्लीतील लॉबीने गोव्‍यात खरेदी केलेल्‍या जमिनी वाचवण्‍यासाठी धडपड? मिकी पाशेको यांचा आमदार व्हेंझींना सवाल

Goa Health Insurance: "प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाला 10 लाखांचा हेल्थ इन्शुरन्स द्या", 'आप'ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, चर्चेसाठी मागितला वेळ

VIDEO: 38 व्या वर्षी क्रिकेटपटूचं निधन; ढसाढसा रडला राशिद खान; अंत्ययात्रेतील व्हिडिओ भावुक करणारा

SCROLL FOR NEXT