Goa Police  Dainik Gomantak
गोवा

सुधारित मोटर वाहन कायद्याची गोव्यात अमलबजावणी, कशी असेल दंडआकारणी?

नियमांचे उल्लंघनप्रकरणी दंडाच्या रकमेत तब्बल 27 वर्षांनी वाढ

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात सुधारित मोटार वाहन कायद्याची आज मध्यरात्री 12 पासून म्हणजेच 1 एप्रिलपासून कडक अमलबजावणी करण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत तब्बल 27 वर्षांनी वाढ झाल्याची माहिती गोव्याचे वाहतूक संचालक राजन सातार्डेकर यांनी दिली आहे. दंडाच्या रकमेत भरभक्कम वाढ करतानाच परवाना रद्द होणार असल्याने वाहनचालकांचं धाबं मात्र दणाणलं आहे.

गोव्यात येत्या 1 एप्रिलपासून नवीन मोटर वाहन कायदा अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसं परिपत्रक प्रादेशिक परिवहन (RTO) खात्याने जारी केलं आहे. नेहमीच्या दंडापेक्षा दहापट दंडाची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. विनाहेल्मेट गाडी चालवल्यास तसंच दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास केल्यास 1000 रुपयांचा दंड आणि परवाना रद्द करण्यात येणार आहे. गोवा सरकारकडून या संबंधी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. केंद्राकडून राज्य सरकारला हा कायदा अमलात आणण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली होती. त्यानुसार हा कायदा लागू करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

गोवा सरकारने (Goa Government) मोटर वाहन कायदा 1998 मधील तरतुदींमध्ये जुलै 2021 मध्ये बदल केले होते. आता या नव्या तरतुदींची अमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून गोव्यात केली जाणार आहे. नवी दंडाची रक्कम ही सध्याच्या रकमेपेक्षा दहापटींनी जास्त असल्याने नियम मोडल्यास वाहनचालकांना भरभक्कम दंड भरावा लागणार आहे. चालकाने वैध परवान्याशिवाय गाडी चालवल्यास किंवा परवाना नसलेली गाडी चालवल्यास तब्बल 10 हजार रुपयांचा दंड (Penalty) आकारला जाईल. तर रजिस्ट्रेशन न झालेली किंवा विमा नसलेली गाडी चालवल्यास 2000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वेगाने गाडी चालवणे, सीट बेल्ट न वापरणे, गाडी चालवताना इतरांचा जीव धोक्यात घालणे असे प्रकार निदर्शनास आल्यास त्याला 1000 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसंच ट्रिपल सीट आणि विनाहेल्मेट दुचाकीवरुन फिरल्यास 1000 रुपये दंड आणि परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT