गोवा वीज खात्यातील तांब्‍याची तार होतेय चोरी

सावर्डेतील प्रकार: टोळी सक्रिय; आतापर्यंत तब्‍बल 20 लाखांचे तांबे विकल्‍याचा अंदाज
Goa Power lines
Goa Power linesDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: रेल्वे दुपदरीकरणाचे काम सध्‍या जोरात सुरू आहे. मात्र या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात काढण्यात आलेली लाखो रुपये किमतीची व वीज खात्याच्या मालकीची तांब्‍याची तार चोरून ती भंगारअड्ड्यांना विकणारी टोळी सावर्डेत सक्रिय असल्‍याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या टोळीकडून आतापर्यंत अनमोडघाट भागात मोठ्या प्रमाणावर तार चोरण्यात आली असून ती सावर्डेतील एका भंगारअड्ड्यावर विकण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, सदर भंगारअड्ड्याच्‍या मालकासह कुडचडे आणि सावर्डे भागातील काही जण या प्रकरणात सहभागी असून दररोज मध्यरात्रीच्या सुमारास तारेची चोरी करून बांदोळ येथील एका खासगी मालमत्तेत त्यांतून तांबे काढले जात आहे. आतापर्यंत सुमारे 20 लाखांचे तांबे विकण्यात आलेले आहे.

Goa Power lines
मागील अर्थसंकल्पात केलेल्या 56 टक्के घोषणांच्या पूर्ततेत अपयश: काँग्रेस

वीज खात्याने घातलेल्‍या तारा महागड्या आहेत. अशा तारांना मोठी मागणी असते. त्या चोरून नेणे म्हणजे मोठा गुन्हा आहे. पण पैशाच्या मोहापायी या तारांची चोरी होत आहे. 500 रुपये प्रतिकिलो या दराने त्‍या सध्‍या विकल्या जाताहेत. मिळालेल्‍या माहितीनुसार, दररोज सायंकाळी मोले येथून लाखो रुपये किमतीच्या तारा अनमोड घाट परिसरातून आणून बांदोळ-सावर्डे येथे

उतरवल्या जात आहेत. मध्यरात्री उशिरा तारांची वाहतूक लहान रिक्षांतून होत आहे. त्यामुळे गेले अनेक महिने सुरू असलेला हा प्रकार कोणाच्याही नजरेत आलेला नाही.

Goa Power lines
Goa Crime: प्रथमेशने मालमत्तेसाठी काढला आईचा काटा!

सावर्डे पंचायत क्षेत्रात असलेल्‍या एका भंगारअड्ड्यात या चोरलेल्‍या तारांतून तांबे काढले जात होते आणि नंतर ते तांबे मोठ्या वाहनात घालून लोहप्रकल्पाला पाठवले जात होते. उघडपणे सुरू असलेला हा प्रकार स्थानिकांच्‍या नजरेत आल्यानंतर भंगारअड्डा चालवणाऱ्या व्यक्तीने चोरीच्या तारा आपल्‍या अड्ड्यावर आणणे बंद केले. आता बांदोळ या ठिकाणी एका खासगी मालमत्तेत हे चोरीचे साहित्य साठवले जाऊ लागले आहे. रात्री उशिरा रिक्षा भरून वीजतारा आणल्‍या जातात. नंतर त्‍यातून तांबे बाहेर काढले जाते. या कामासाठी कामगार लावण्यात आलेले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com