New Mandovi Bridge Dainik Gomantak
गोवा

New Mandovi Bridge: वाहनचालकांची डोकेदुखी वाढली; 5 एप्रिलपर्यंत नवा मांडवी पूल राहणार बंद, पर्यायी मार्ग काय?

Mandovi Bridge: जुन्या मांडवी पुलाच्या डागडुजीनंतर आता नवा मांडवी पूल दुरुस्तीच्या कामासाठी २७ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : जुन्या मांडवी पुलाच्या डागडुजीनंतर आता नवा मांडवी पूल दुरुस्तीच्या कामासाठी २७ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या दहा दिवसांच्या काळात सर्व प्रकारची वाहतूक जुन्या पुलावरून वळवण्यात येईल.

१२ टनांपेक्षा कमी असलेली वाहनांना या जुन्या पुलावरून जाण्यास परवानगी असेल मात्र १२ टनाहून अधिक वजन असलेली वाहने अटल सेतू मार्गे वळवण्यात येतील. याबाबतचा सार्वजनिक बांधकाम खात्याने नुकताच आदेश जारी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने मागील महिन्यात जुना मांडवी पुलाचे दुरुस्ती काम केले होते. यावेळी हा पूल १५ दिवस बंद ठेवण्यात आला होता. यामुळे पणजी तसेच पर्वरी भागात वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांचे बरेच हाल झाले होते.

पणजीतील स्मार्ट सिटीची कामे तसेच पर्वरीतील उड्डाण पुलाच्या काम सुरू आहे यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली होती. ही कोंडी नेहमी सकाळी व संध्याकाळच्या वेळेत होत असून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तशीच पुन्हा ही समस्या उद्‍भवण्याची शक्यता आहे.

बारावीची परीक्षा संपल्यानंतर नव्या मांडवी पुलाचे काम हाती घेण्यात येणार होते, मात्र पालक व विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला होता त्यामुळे १ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसेल या अनुषंगाने हे काम लांबणीवर टाकण्यात आले होते. बारावी परीक्षा संपल्याने आता हे काम हाती घेण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT