Goa Budget 2025: गत अर्थसंकल्पातील 98.88% टक्के कामं प्रगतिपथावर, मात्र 'या' आश्वासनांची पूर्तता अपूर्ण

Goa Budget: राज्याचा आर्थिक आढावा समोर आला असून यामध्ये २०२४-२५ या वर्षासाठी महसुली प्राप्ती २१,७३१.४९ कोटीएवढी आहे.
Goa Budget 2025
Goa Budget 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्याचा आर्थिक आढावा समोर आला असून यामध्ये २०२४-२५ या वर्षासाठी महसुली प्राप्ती २१,७३१.४९ कोटीएवढी असून, ती २०२३-२४ च्या पुनरावलोकित अंदाजाच्या तुलनेत ४.२१ टक्यांनी वाढल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या आर्थिक वर्षासाठी महसुली शिल्लक १,७२०.१९ कोटी, वित्तीय तूट ३,१४९.४७ कोटी आणि भांडवली प्राप्ती ४,३२६.६६ कोटी असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. तसेच राज्याच्या अंतर्गत कर्जाची रक्कम २०२४-२५ मध्ये देखील आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद केले आहे.

तसेच वित्तीय वर्ष २०२४-२५ साठी सादर केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात एकूण ४४६ आश्वासने दिली गेली होती. यापैकी ४४१ (९८.८८%) आश्वासनांची अंमलबजावणी सुरू आहे किंवा ती पूर्ण झाली आहे. मात्र, ५ (१.१२%) आश्वासने विविध प्रशासकीय कारणांमुळे रखडली किंवा रद्द झाली आहेत.

Goa Budget 2025
Goa Budget 2025: अर्थसंकल्प सादरीकरणावेळी विरोधकांची मुस्कटदाबी, लेखानुदान मंजुरी आणि सभापतींचे समारोपाचे भाषणही गदारोळातच

ही आश्‍वासने बासनात

१. आदिवासी कल्याण संचालनालयाचे अनेक प्रस्ताव ११/१०/२०२४ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या प्रकल्प मूल्यमापन समितीच्या बैठकीत नाकारण्यात आले.

२. यामध्ये किर्लपाल-दाबाळ, धारबांदोडा येथे सातेरी जल्मी मंदिराजवळ सामुदायिक सभागृह बांधकाम

Goa Budget 2025
Goa Budget 2025: गोमंतकीयांच्या आशा-आकांक्षांना बळ देणारा 'अर्थसंकल्प', कोणत्या नव्या तरतुदी? वाचा माहिती

३. साकोर्डा, धारबांदोडा येथे संस्कृती भवनाचे बांधकाम.

४. आमरखाने, केरी-फोंडा येथे सत्यनारायण मंदिरात सभागृह बांधकाम

५. हे प्रस्ताव नाकारल्याने यासंदर्भात दिलेली आश्वासने अमलात आणता आलेली नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com