Yuri Alemao Birthday Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao Birthday: ‘नवा गोवा’ घडवूया! वाढदिनी युरींचा संकल्प; व्यासपीठावर विरोधकांची एकजूट, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

Political unity Goa: आपण सर्व भेदभाव विसरून एकत्र आलो, तर ही एकजूट भविष्यात मोठा बदल घडवू शकते, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आपल्या वाढदिनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

कुंकळ्ळी: “गोव्याचे भविष्य नव्याने घडवायचे असेल, तर विरोधकांची एकजुट हाच एकमेव मार्ग आहे. माझ्यासाठी गोवा हे पहिले प्राधान्य आहे. गोव्याला आज स्वच्छ, पारदर्शक आणि प्रामाणिक राजकारणाची गरज आहे. आपण सर्व भेदभाव विसरून एकत्र आलो, तर ही एकजूट भविष्यात मोठा बदल घडवू शकते, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आपल्या वाढदिनी सांगितले.

युरी आलेमाव यांनी आपल्या वाढदिनी नवा गोवा घडविण्याचा केलेला संकल्प आज राजकीय पातळीवर चर्चेचा ठरला. कारण मंचावर फक्त शुभेच्छुक नव्हते, तर एकाच व्यासपीठावर उभे होते विविध पक्षांचे आघाडीचे नेते.

विरोधकांचा एकत्रित फोटोच सत्ताधाऱ्यांची झोप उडवणारा ठरू शकतो, असेही युरींनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले. कार्यकर्ते, सामान्य समर्थक आणि तळागाळातील युवकांनी युरींच्या वाढदिनाच्या कार्यक्रमास मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, आमदार कार्लुस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्टा, आमदार वीरेश बोरकर, आरजी प्रमुख मनोज परब, काँग्रेस गटाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. युरी आलेमाव पुढे म्हणाले, की माझ्यासाठी गोवा प्रथम आहे. सर्वांनी एकत्र येऊन गोवा जिंकण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T-20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची एन्ट्री! 'या' देशाच्या स्वप्नांचा केला चुराडा

Magh Purnima 2026: कष्टाचं फळ मिळणार अन् कष्ट दूर होणार! माघ पौर्णिमेला 5 शुभ योगांचा महासंयोग; 'या' राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात

Video: 'अभिषेक झाला, सूर्या झाला'! भारताचा 'हा' फलंदाज आता चोपणार न्यूझीलंडला; प्रॅक्टिसचा व्हिडीओ झाला Viral

Russia Train Attack: 'काळ्या धुराचे लोट अन् रडणाऱ्या प्रवाशांचा आक्रोश'! रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनची रेल्वे सेवा उद्ध्वस्त; 12 जणांचा मृत्यू Watch Video

Shadashtak Yog 2026: "जुनी कर्जे फिटणार, आनंदाचे दिवस येणार!" मंगळ-गुरुचा महासंयोग 'या' राशींसाठी ठरणार भाग्योदयाची नवी पहाट

SCROLL FOR NEXT