Goa Education News Dainik Gomantak
गोवा

New Academic Year: एप्रिलमध्‍येच शाळा का? शिक्षण खात्‍याच्‍या सूत्रांनी दिले उत्तर; बदल चिंताजनक असल्याचे आलेमाव यांचे आरोप

New Education Policy Goa: नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे तसेच शिक्षकांचे कामाचे दिवस हे प्रत्येकी २२० करण्यात आलेले आहेत.

Sameer Panditrao

New Academic Year In Goa

पणजी: नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे तसेच शिक्षकांचे कामाचे दिवस हे प्रत्येकी २२० करण्यात आलेले आहेत. पूर्वीच्या धोरणानुसार शिकवण्याचे दिवस २०० तर शिक्षकांचे कामाचे एकूण दिवस २२० असायचे. परंतु आता दिवस समान झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण खात्‍याच्‍या सूत्रांनी सांगितले.

शाळेची वेळ वाढविली तरी मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात येतो. दिवाळी, नाताळ किंवा इतर सुट्ट्या कमी करून शाळा घेणे देखील शक्य होणार नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्‍याचे समजते.

एरवी दोन सत्रांत परीक्षा घेतल्‍या जातात. पहिल्या सत्रात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. परंतु दुसऱ्या सत्रासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने घाईगडबडीत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.

दुसऱ्या सत्राच्या कालावधीत क्रीडा महोत्सव, स्नेहसंमेलन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्‍यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ खर्ची जातो. त्यामुळे एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यावाचून पर्याय नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

शैक्षणिक वर्षातील बदल चिंताजनक : चर्चिल आलेमाव

माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यातील शैक्षणिक वेळापत्रकातील बदलाबाबत चिंता व्यक्त केली आहे. एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे पालक संभ्रमित झालेले आहेत. शैक्षणिक वेळापत्रकातील अलीकडील बदल हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० आणि नॅशनल करिकुलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशनमध्‍ये २०२३ (एनसीएफएसई) नमूद केलेल्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात असल्याचे दिसून येते. २०२४-२५ शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या पदोन्नतीबाबत स्पष्ट आणि तपशीलवार सूचना नसल्यामुळे प्रचंड मानसिक ताण, अनिश्चितता निर्माण झाली आहे, असा दावा त्‍यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT