Russia to Goa Direct Flight Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: युरोप-आशियातून थेट गोवा! रशिया-कझाकस्तानमधून 2 नवीन विमानसेवा सुरु

Russia Kazakhstan Goa Flights : या दोन नवीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या या महिन्यात गोव्यात थेट विमानसेवा सुरू करणार आहेत

Akshata Chhatre

Direct International Flights to Goa: गोव्यातील वर्षाअखेरीस होणाऱ्या सणांसाठी आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यात पर्यटन खाते अग्रेसर असते. वर्षाअखेरीच्या याच दरम्यान गोव्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी एक मोठी आणि सकारात्मक बातमी समोर आलीये. कझाकस्तानची 'फ्लाय एरिस्टन' (Fly Arystan) आणि रशियाची 'नॉर्थविंड एअरलाइन्स' (Nordwind Airlines) या दोन नवीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या या महिन्यात गोव्यात थेट विमानसेवा सुरू करणार आहेत.

पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही कंपन्या प्रत्येकी दोन थेट विमानांची सेवा चालवणार असून या नवीन सेवांमुळे गोवा आणि रशियातील प्रमुख शहरांदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होतील. सध्या रशियासाठी 'एअरोफ्लोट' (Aeroflot) आणि कझाकस्तानसाठी 'एससीएटी एअरलाइन्स' (SCAT Airlines) यांच्यामार्फत गोव्याची थेट विमानसेवा सुरू आहे.

नवीन विमानांचे वेळापत्रक

पर्यटन संचालक केदार नाईक यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, अल्माटी, अस्ताना (कझाकस्तान), मॉस्को आणि येकाटेरिनबर्ग (रशिया) येथून शेड्यूल केलेले आगमन गोव्याचा प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी असलेला सहभाग दर्शवते.

या सेवांमुळे गोव्याची जागतिक व्याप्ती वाढणार आहे आणि पीक सिझनमध्ये प्रवाशांना गोव्यात सहज प्रवेशही मिळेल. कझाकस्तानची 'फ्लाय एरिस्टन' अल्माटी येथून पहिली विमानसेवा २६ डिसेंबर रोजी सकाळी १०:२५ वाजता सुरू करेल आणि दुसरी विमानसेवा अस्ताना येथून ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ७:४० वाजता गोव्यात पोहोचेल.

'गोव्याची जागतिक व्याप्ती वाढणार'

त्याचप्रमाणे, 'नॉर्थविंड एअरलाइन्स' मॉस्को येथून पहिली थेट विमानसेवा ३० डिसेंबर रोजी दुपारी ११:५५ वाजता सुरू करेल. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११:१५ वाजता येकाटेरिनबर्ग येथून दुसरी विमानसेवा गोव्यात दाखल होईल.

पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, नवनवीन शेड्यूल केलेल्या विमानांच्या आगमनामुळे जागतिक विमान कंपन्यांचा गोव्यावरील वाढलेला विश्वास दिसून येतो. कझाकस्तान आणि रशियाशी कनेक्टिव्हिटी मजबूत झाल्यामुळे पर्यटन देवाणघेवाणीच्या व्यापक संधी खुल्या होतील आणि गोव्याच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला आणखी गती मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: भारतातच नाही तर थेट बलोचमध्येही 'खन्नाची हवा'; दिग्गज नेते झालेत फॅन, म्हणाले "हा तर हुबेहूब..."

अग्रलेख: हडफड्याच्या अग्निकांडाचा उगम कझाकस्थानात? कझाकी नर्तिकेचं नृत्य नसतं तर क्लबला आग लागली नसती?

'बासमती' नुसता बहाणा! ट्रम्प यांच्या आयात शुल्कवाढीमागे अर्थकारण कमी, अहंकारच अधिक - संपादकीय

Amazon Investment In India: भारतात 35 अब्ज डॉलर गुंतवणूक, अमेझॉनची घोषणा; देशात 10 लाख नोकऱ्या निर्माण होणार

Goa Live News: "मी फक्त 'गुंतवणूकदार"- 'बर्च'चा भागीदार अजय गुप्ताचा दावा

SCROLL FOR NEXT