Bicholim News Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: वाठादेव भागातील बागायतदारांसमोर 'नवं संकट'; चक्क दगडी कुंपण मोडत...

लोकांमध्ये घबराट : कळपाने संचार

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News डिचोली तालुक्यातील वाठादेव-व्हावटी भागात सध्या गव्यांचा संचार वाढला असून, हे गवे लोकवस्तीजवळ फिरत असल्याचे आढळून येत आहे.

या गव्यांनी परिसरात उच्छाद मांडण्यास सुरवात केली आहे. बागायती पिकांची नासधूस करत आहेत. लोकवस्तीजवळच कळपाने गवे संचार करीत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. बागायतदारही चिंतेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सात ते आठ गवे कळपाने या परिसरात मुक्तपणे संचार करीत आहेत. गव्यांचा उपद्रव वाढण्यापूर्वीच वन खात्याने या गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाठादेव आणि व्हावटी भागातील नागरिकांकडून होत आहे.

गेल्या जवळपास पंधरा दिवसांपासून गव्यांचा वाठादेव भागात संचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

या गव्यांनी बागायती पिकांची नासधूसही सुरू केली आहे. गव्यांनी वाठादेव येथील एका कुळागराजवळील दगडी कुंपणाचीही मोडतोड केली आहे. एखादेवेळी हे गवे चवताळले तर माणसांवरही हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कुळागरांतील पिकांची नासाडी रोखण्यासाठी आणि अनर्थ टाळण्यासाठी वन खात्याने या गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी एक बागायतदार महेश उमर्ये यांनी केली आहे.

गव्यांची संख्या आता वाढली आहे. जंगल सोडून गवे लोकवस्त्यांजवळ येण्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे घाट वा डोंगराळ परिसरात त्यांना खाद्य मिळणे दुरापास्त झाले आहे.

खाद्याच्या शोधार्थ गव्यांनी आपला मोर्चा लोकवस्त्यांजवळ वळवला आहे. अलीकडच्या काळात बहुतेक ग्रामीण भागांत गव्यांचे अस्तित्व जाणवत आहे. - अमृत सिंग, प्राणीमित्र

पाऊलखुणा उमटल्या

रात्रीच्यावेळी हे गवे वाठादेव भागातील कुळागरांनी घुसतात. काही कुळागरांनी गवे फिरले असून त्यांच्या पावलांच्या खुणाही उमटल्याचे आढळून येत आहे.

सोमवारी (ता.29) वाठादेव येथे तर एका कुळागरात गवे बराच वेळ ठाण मांडून होते. लोकांनी फटाके फोडून आणि आवाज करून या गव्यांना हुसकावून लावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT