Baby Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : मडगावात नवजात अर्भकाला उघड्यावर फेकलं

शिरवडे मडगाव येथे उघड्यावर टाकून दिलेले नवजात अर्भक सापडले आहे. मुलगी झाल्यामुळे पालकांनी टाकून दिल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

सुशांत कुंकळयेकर

Goa Crime : मडगावात आज गुरुवारी सकाळी एक नवजात अर्भक उघड्यावर सापडल्याने खळबळ उडाली आहे. शिववडे मडगाव येथे आज सकाळी 9 च्या सुमारास उघड्यावर टाकून दिलेले नवजात अर्भक सापडले. हे अर्भक एक मुलगी असल्यानेच टाकल्याची माहिती प्राथमिक तपासातून निष्पन्न झाली आहे.

सदर अर्भक मुलगी असून प्रसूती झाल्यावर त्याची माता तिला तिथेच टाकून पळून गेली. मडगावातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या जवळ झाडीत ते अर्भक होते. पोलिसांना याची माहिती मिळताच तातडीने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर त्याला जिल्हा इस्पितळात दाखल केले. सध्या या अर्भकाची प्रकृती सुदृढ असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस आता या अर्भकाच्या मातेचा शोध घेत आहेत.

दुसरीकडे बाणसाय कुडचडे येथे बेकायदेशीर रेती व्यवसायातून एका कामगाराचा गोळी झाडून खून केल्याची खळबळजनक घटना घडली असून यात एक कामगार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असून एक कामगार या हल्ल्यातून सुदैवाने बचावला आहे.

सदर घटना काल मध्यरात्री सुमारे दीड वाजता घडली असल्याचे पोलीस अधिक्षक सेमी तावारीस यांनी सांगितले. रेती आणण्यासाठी होडी घेऊन जात असताना अज्ञात व्यक्तीने या कामगारांवर गोळी झाडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO Advance New Rules: आजारपण, लग्न, शिक्षण अन् घरासाठी PF काढण्याचे नियम बदलले; किती वेळा आणि किती पैसे काढता येणार?

October Temperature: गोव्यात ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा विक्रम! पणजीत पारा 37.4 अंशांवर, म्हापशात 39.6 अंशांची नोंद

Horoscope: नवरात्रीचा पाचवा दिवस ठरणार भाग्याचा! 5 राशींचे नशीब चमकणार; प्रगतीचे संकेत, आर्थिक लाभाची शक्यता; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Tourist Death: कळंगुटमध्ये उघड्या लोखंडी सळ्यांनी घेतला पर्यटकाचा जीव; बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

New Medical College: गोव्यात नवे मेडिकल कॉलेज; 50 एमबीबीएस जागांना केंद्राची मंजुरी, निम्म्या जागा गोमंतकीयांसाठी

SCROLL FOR NEXT