Vishwajit Rane and GMC Dean Shivanand Bandekar Dainik Gomantak
गोवा

गोमेकॉच्या डीन नियुक्तीचा निर्णय काही तासांतच फिरवला

आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंच्या ट्विटने आश्‍चर्य, राणेंचा मंत्रिमंडळातील दबदबा वाढल्याचे चित्र

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकपदाचा निर्णय आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काही तासांतच फिरवून आपल्या बाजूने केला. मंत्रिमंडळात दोन नंबरचे स्थान पटकावलेल्या राणेंनी हे प्रशासनाला दिलेले आव्हानच मानले जात आहे.

सोमवारी सकाळी प्रशासनाचे अव्वर सचिव श्रीपाद आर्लेकर यांनी महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधीक्षकपदी डॉ. जयप्रकाश तिवारी यांच्या नियुक्तीचे परिपत्रक काढले होते. पण संध्याकाळ होताच आरोग्यमंत्र्यांनी हा निर्णय स्थगित ठेवण्यात आला असून गोमेकॉच्या (GMC) अधीक्षकपदी डॉ. शिवानंद बांदेकर हेच राहतील, असे ट्विट केले. याचे अनेकांना आश्चर्य वाटले असले तरी राणेंचा मंत्रिमंडळातील दबदबा वाढल्याचे यातून दिसून आले.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेफ्रॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. तिवारी हे ज्येष्ठतेच्या आधारे डीनपदासाठी पात्र आहेत. गोवा लोकसेवा आयोगानेही यापूर्वीसुद्धा त्यांची या पदासाठी नियुक्ती केली होती. मात्र, विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांच्या मर्जीतील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. शिवानंद बांदेकर यांना हे पद देण्यात आले. नव्या मंत्रिमंडळातही आरोग्यमंत्रीपदही पुन्हा राणे यांच्याकडे आले. आज सकाळी प्रशासनाने तिवारी यांच्या नियुक्तीचा आदेश ‘जारी’ केला. त्यामुळे राणे यांनी मुख्यमंत्र्यांशी (CM) चर्चा करून या निर्णयाला स्थगिती दिल्याचे जाहीर केले.

डॉ. शिवानंद बांदेकर यांनी कोविड काळात सर्वोत्तम सेवा दिली असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांना रुग्णालय आणि महाविद्यालय चांगल्या प्रकारे चालवून रुग्णांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांच्याच काळात औषध खरेदी आणि वाटपात घोटाळा झाल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता. त्यामुळे बांदेकर चर्चेत राहिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT