भाजपसोबत होतो तेव्हाच कारवाई का नाही केली? लोबोंचा सवाल

सोनसोडो प्रकरण सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचा मायकल लोबोंचा दावा
Michael Lobo
Michael LoboDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : सदानंद शेट तानावडेंनी मायकल लोबो यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर आता लोबोंनी भाजपवर निशाणा साधला आहे. जर मी दोषी होतो तर मी भाजपसोबत असताना कारवाई का केली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच तानावडेंच्या आरोपांवर जास्त बोलू इच्छित नाही असंही ते म्हणाले.

Michael Lobo
जनतेचे प्रश्‍‍न आक्रमकपणे मांडणार : मायकल लोबो

मागील भाजप (BJP) सरकारच्या काळात मंत्री असलेले मायकल लोबो यांनी लुटीतून पैसे केले आणि त्यांच्याकडे पैसे असल्याने लोबो यांना विरोधी पक्षनेतेपद बहाल केल्याचा आरोप तानावडे यांनी केला होता. या आरोपांवर काँग्रेसनेही पलटवार केला होता. मंत्री लूटमार करत होते हे माहीत होते तर तानावडे तेव्हा गप्प का बसले, असा सवाल काँग्रेसने (Congress) केला. अशी लूट पुन्हा होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी व तशी खात्री लोकांना द्यावी. लोबो यांच्याकडे जो पैसा आहे तो त्यांनी आपल्या व्यवसायातून कमावलेला आहे आणि त्याचा करही ते सरकारला भरतात, असे अमरनाथ पणजीकर यांनी तानावडेंच्या आरोपांनंतर स्पष्ट केले.

Michael Lobo
गोव्यात राजकारण तापलं, तानावडे आणि लोबो आमनेसामने

जर मी भ्रष्टाचार करत होतो तर पक्षाने तेव्हाच माझ्यावर कारवाई केली पाहिजे होती, जेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. मी पक्ष सोडल्यावर आरोप करणं चुकीचं असून आता केवळ आरोप करायचे म्हणून भाजपकडून अशा प्रकारची वक्तव्यं केली जात आहे, असं मायकल लोबोंनी (Michael Lobo) म्हटलं आहे. भाजपकडून सोनसोडो प्रकरणी आरोप केले जात आहेत, मात्र आपल्याच काळात सोनसोडो प्रश्न सोडवण्यासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती. तसंच सोनसोडोवर नवीन प्रकल्प करण्याबाबतही पावलं उचलली होती. मात्र भाजपनेच हा प्रश्न रखडवल्याचं लोबोंनी म्हटलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

CM Pramod Sawant Inquiry Order
goa crime branch busts two fake call centers
Goa Mandovi River Casino Dispute
Goa Karnataka Border Conflict 2026:
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com