Neura Railway Station Dainik Gomantak
गोवा

Goa Railway: 'नेवरा'त नवीन रेल्वे स्टेशन झाल्यास चोऱ्यांचे प्रमाण वाढेल, स्थानिकांना सतावतेय भीती; काय आहे तर्क जाणून घ्या

Neura Railway Station: नेवरा आणि सभोवतीच्या परिसरात चोऱ्यांचे प्रमाण पूर्वीच वाढले असून त्यात रेल्वेस्थानक येथे आल्यास चोरट्यांना थेट येथे उतरण्याची सोय मिळणार आहे.

Sameer Panditrao

Locals Oppose Neura Railway Station

तिसवाडी: नेवरा, सारझोरा आणि मये येथे नवीन रेल्वेस्थानक बांधण्याची घोषणा कोकण रेल्वेकडून केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अभिनंदन केले; परंतु ही घोषणा झाल्यानंतर नेवरा आणि सभोवतीच्या डोंगरी, आजोशी, पिलार आणि आगशी गावांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यापूर्वी रेल्वेस्थानकाला विरोध केला होता आणि आतादेखील विरोध करणार असल्याचा पवित्रा नेवरावासीयांनी घेतला आहे.

राज्यातील प्रमुख रेल्वेस्थानकांपैकी एक करमळी रेल्वेस्थानक हे अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असल्याने नेवरा येथील स्थानकाचा कोणाला लाभ होईल. पणजी सुमारे १८ किलोमीटर, दाबोळी विमानतळ १८ किलोमीटर, मडगाव २० किलोमीटर असल्याने सहजरीत्या जाण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे.

त्यात नेवरा गाव हा पिलार आणि जुने गोवे यांच्यादरम्यान असल्याने येथे उतरल्यास पणजी किंवा मडगाव येथे जाणे लांब पडणार आहे. त्यामुळे सरकारने आणि कोकण रेल्वे यांनी प्रथम हे रेल्वेस्थानक कशासाठी आणले जात आहे, हे स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.

नेवरा आणि सभोवतीच्या परिसरात चोऱ्यांचे प्रमाण पूर्वीच वाढले असून त्यात रेल्वेस्थानक येथे आल्यास चोरट्यांना थेट येथे उतरण्याची सोय मिळणार आहे. त्यामुळे येथे रेल्वेस्थानक येता कामा नये, अशा प्रतिक्रिया ऐकू येऊ लागल्या आहेत.

राज्यात कोसळा वाहतूक करण्याचा सरकारचा मनसुबा उघड असून नेवरा येथे झुआरी नदीचा फाटा जोडलेला आहे. येथे रेल्वेस्थानक बांधून कोळसा वाहतुकीसाठी साधनसुविधा निर्माण करण्याचा सरकारचा डाव असू शकतो. कारण करमळी रेल्वेस्थानक जवळ असल्यामुळे येथे नवीन रेल्वेस्थानक बांधण्याची गरजच नाही आणि तसे जर कोकण रेल्वे व सरकारला वाटत असेल, तर त्यांनी प्रथम लोकांना विश्वास घेणे आवश्यक आहे.
रामराव वाघ, अध्यक्ष, खाजन ॲक्शन समिती
नेवरा येथे रेल्वेस्थानक येण्यास माझा तीव्र विरोध आहे; कारण पूर्वी या परिसरात चोऱ्या वाढल्या आहेत. त्यात नवीन रेल्वेस्थानक आल्यास येथे परप्रांतीय येणार. याचे गंभीर परिणाम नेवरा आणि सभोवतीच्या परिसरावर होतील.
ॲड. हॉनोरिना आरावजो, माजी सरपंच तथा पंचसदस्य, नेवरा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवून 1.52 कोटींचा गंडा, सायबर फसवणूक प्रकरणी मुंबईतून एकाला अटक; गोवा पोलिसांची कारवाई!

IND vs WI 2nd Test: 38 वर्षांपासून एकही पराभव नाही, 'दिल्ली'चं मैदान टीम इंडियासाठी लकी; जाणून घ्या काय सांगते आकडेवारी?

Goa Crime: ग्रील कापून घरात घुसले, दाम्पत्याला बांधून ठेवलं, 50 लाखांचा ऐवज केला लंपास; म्हापशात बुरखाधारी दरोडेखोरांची दहशत

Nobel Prize Physics 2025: भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर! क्वांटम मेकॅनिकल टनलिंगच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांचा गौरव

Horoscope: उद्याचा दिवस खास! 8 ऑक्टोबर रोजी शुभ धन योगामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार, गणेशाचा असेल विशेष आशीर्वाद

SCROLL FOR NEXT