containment zone 
गोवा

नेरुल मायक्रो कंटेन्‍मेंटमध्‍ये

Datta Shirodkar

दत्ता शिरोडकर

पर्वरी : नेरुल पंचायतक्षेत्रातील ११ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाल्याने स्‍थानिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही संख्‍या वाढण्‍याची शक्‍यता असल्‍याने रविवारी सायंकाळी उशिरा हा परिसर मायक्रो कंटेन्‍मेंट झोन म्‍हणून जाहीर केला आहे. सर्वप्रथम नेरुल टिटवाडा येथील एक रुग्ण सापडला होता. तो पणजी येथे कामाला होता. त्यानंतर फट्टावाडा येथील एका इमारतीत दुसरा रुग्ण सापडला होता. तो वास्को येथील एका शिक्षण संस्थेचे रंगकाम करण्यासाठी जात होता. यादरम्यान नेरुल  पंचायत मंडळाने तातडीने बैठक घेऊन कांदोळी येथील आरोग्य खात्याच्या डॉक्टर्सना संपर्क करण्यात आला व नेरुल सरकारी प्राथमिक शाळेत येऊन १११ जणांनी ‘कोविड-१९’ तपासणी करून घेतली होती. त्यापैकी ११जणांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आल्याने त्या सर्वांना कोरोना उपचार केंद्रात उपचारासाठी पाठविण्यात आल्याचे नेरुल पंचायतीचे उपसरपंच अभिजित बाणावलीकर यांनी सांगितले. नेरुल शाळेत एकूण १११ रुग्णांपैकी १०० नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पंचायत मंडळाने आज तातडीने बैठक घेऊन सर्व नागरिकांनी सामाजिक सुरक्षित अंतर व मास्‍क वापरून स्‍वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. कळंगुट येथे एका हॉटेलमध्ये आलेला एक टुरिस्ट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले. त्‍याला कोविड तपासणी केंद्रात ठेवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT