Goa Chicalim Theft Dainik Gomatak
गोवा

Goa Theft News: पुतणीने चोरले काकीचे 12 लाखांचे दागिने

Goa Theft News: वाच्‍यता केल्यास काकाला मारण्याची धमकी

दैनिक गोमन्तक

Goa Theft News: आपल्‍या पुतणीनेच सुमारे 12 लाख रुपयांचे दागिने चोरल्‍याचा आरोप काकीने केला आहे. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास काकाला जीवे मारण्याची धमकी दिल्‍याचेही काकी निकिता म्हामल यांनी तक्रारीत म्‍हटले आहे.

दरम्‍यान, पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन संशयित विशाखा म्हामल (25, मालवारा-आगशी) हिला अटक केली. त्‍यानंतर तिला न्यायालयात उभे केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्‍यात आली.

सदर घटना काल मंगळवारी उघडकीस आली, जेव्हा निकिता म्हामल यांनी आगशी पोलिसांत आपले दागिने चोरी झाल्याची तक्रार केली. तसेच आपली पुतणी विशाखा म्हामल हिच्‍यावर संशय असून तिने पोलिसांत तक्रार केल्यास जीवे

मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्‍या ३८० आणि ५०६ (२) कलमांखाली विशाखाला अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. न्यायलयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. चोरीस गेलेले दागिने अजूनही मिळालेले नाहीत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पराग पारेख करत आहेत.

आगशीतील घटना : संशयित अटकेत

म्हामल कुटुंब मालवारा-आगशी येथे एक मजली घरात राहते. तळमजल्यावर निकिता राहतात तर वरच्या मजल्यावर विशाखा राहते. चोरी झाल्याचे कळताच निकिता यांनी विशाखाला विचारले. त्‍यावेळी तिने पोलिसांत गेल्‍यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे निकिता यांनी तक्रारीत नमूद करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT