Tragic Student Death Dainik Gomantak
गोवा

Goa Casino Death: तोल जाऊन पडला आणि बुडाला! मांडवीत पडून मृत्यू पावलेल्या युवकाची पटली ओळख; अतिमद्यप्राशनाचा संशय

Mandovi River Death: मिळालेल्‍या माहितीनुसार, दोनपावला येथे एका भाड्याच्या खोलीत राहणारा बिरेंद्र सिंग बोरा (३५) हा नेपाळी युवक काल रात्री तरंगत्या कॅसिनोवर गेला होता.

Sameer Panditrao

पणजी: मांडवी नदीच्‍या किनारी कॅसिनोसमोरच्या कठड्यावर झोपलेल्या एका तरुणाचा तोल जाऊन पाण्यात पडून बुडाल्‍याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. नदीत पडलेल्या या तरुणाला वाचवण्यासाठी तेथे जवळच मासेमारी करणाऱ्या युवकांनी धावपळ केली. त्याला गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी नेले. परंतु डॉक्टरांनी त्‍याला मृत घोषित केले.

मिळालेल्‍या माहितीनुसार, दोनपावला येथे एका भाड्याच्या खोलीत राहणारा बिरेंद्र सिंग बोरा (३५) हा नेपाळी युवक काल रात्री तरंगत्या कॅसिनोवर गेला होता. त्याच्या हातात कॅसिनोचा एंट्री बेल्ट होता. कॅसिनोमधून आज बुधवारी पहाटेच्या सुमारास तो बाहेर आला व तेथीलच नदीच्‍या किनारी कठड्यावर झोपला.

दरम्‍यान, पोलिसांनी बिरेंद्र सिंग बोरा याच्‍या अंगावरील कपड्यांची तपासणी केली असता त्याच्या खिशात एक कार्ड सापडले. त्यावर त्याचे नाव व राहत असलेला दोनापावल येथील पत्ता होता. त्यावरून त्याची ओळख पटली.

मच्‍छीमारांचे प्रयत्‍न ठरले व्‍यर्थ

बिरेंद्र बोरा हा मद्यावस्थेत असण्याची शक्यता आहे. त्‍यामुळे त्याचा तोल गेला आणि पाण्यात पडला असावा. पाण्याची पातळी किनारी अधिक असल्याने तो बुडूनच राहिला. हा प्रकार तेथूनच काही अंतरावर मासेमारी करत असलेल्या तरुणांनी पाहिला व त्याला पाण्यातून बाहेर काढले. नंतर त्याला १०८ रुग्णवाहिकेने गोमेकॉ इस्पितळात नेण्यात आले.

पणजीत रेस्टॉरंटमध्ये करायचा काम

पोलिसांनी मयत बिरेंद्र सिंग बोरा याच्या नेपाळ येथील कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र अजूनही त्याची माहिती मिळालेली नाही. तो पणजीतीलच एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होता व भाडेपट्टीच्या खोलीत एकटाच राहत होता. मृतदेहाचा पंचनामा करून तो शवागारात ठेवण्यात आला आहे. शवचिकित्सा अहवालानंतरच त्याच्या मृत्यूमागील कारण स्पष्ट होईल. पोलिस निरीक्षक विजय चोडणकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT