Nepali worker drowns in Goa Dainik Gomantak
गोवा

Mandrem Accident: दारु पिऊन बोटीने प्रवास करणाऱ्या नेपाळी तरुणाचा नदीत बुडून मृत्यू; दुसऱ्याने झाडाच्या फांद्यांना पकडून वाचवला जीव

Nepali worker drowns in Goa: मांद्रे येथील जूनस नदीच्या-बॅकवॉटरमध्ये शनिवारी (28 जून) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात एका नेपाळी कामगाराचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Manish Jadhav

मांद्रे: मांद्रे येथील जूनस नदीच्या-बॅकवॉटरमध्ये शनिवारी (28 जून) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात एका नेपाळी कामगाराचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तो आणि त्याचा साथीदार दारुच्या नशेत छोट्या बोटीने प्रवास करत होते. बोट उलटल्यानंतर एकाने झाडाच्या फांद्यांना पकडून जीव वाचवला, तर दुसऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसली, तरी तो मांद्रेतील एका हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. तो आणि त्याचा सहकारी दोघेही मूळचे नेपाळचे असून काही काळापासून गोव्यात काम करत होते.

स्थानिक सूत्रानुसार, त्यांना बोट चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तरीही दोघांनी दुपारी मद्यधुंद अवस्थेत बॅकवॉटरमध्ये बोट घेऊन प्रवास सुरु केला. काही अंतर गेल्यानंतर बोट अचानक असंतुलित होऊन उलटली. त्यात एक जण पाण्यात बुडाला. अपघाताची माहिती मिळताच गावचे सरपंच रॉबर्ट फर्नांडिस यांनी स्वतः शोधमोहीम सुरु केली. त्यांना पंच सदस्य रोजा फर्नांडिस आणि इतर स्थानिक रहिवाशांनी मदत केली. काही वेळाने स्थानिक बचाव पथकाने मृतदेह हाती लागेपर्यंत शोधमोहीम सुरु ठेवली.

दरम्यान, घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून मद्यप्राशन करुन बेकायदेशीररीत्या जलप्रवास करणे किती धोकादायक ठरु शकते, याचे हे उदाहरण ठरले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रमुख मुद्दे

मृत तरुण वाचलेल्याच्या तरुणाच्या हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता.

दोघांनी बेकायदेशीररीत्या बोट जलप्रवासासाठी वापरली.

बोट उलटल्यानंतर एकाने झाडाच्या फांद्यांना पकडून जीव वाचवला, दुसरा पाण्यात बुडाला.

स्थानिक सरपंच आणि रहिवाशांनी तातडीने मदतकार्य राबवले.

पोलीस (Police) तपास सुरु असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT