
मांद्रे: मांद्रेतील धवरुख संस्थतर्फे पर्यावरणाचे संवर्धन व सामाजिक बांधिलकी जपण्याचा सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. २०१७ पासून हे काम सुरु आहे. आतापर्यंत या संस्थेने ३० हजार वृक्षारोपण केले असून, यातील १५ हजार झाडे जगविण्यात संस्थेला मोठे यश मिळाले आहे.
मोरजी, मांद्रे, हमरल, केरी या भागांत धवरुख ही संस्था वृक्षारोपण व भूजल संवर्धनासाठी झटते. या संस्थेने आतापर्यंत जमिनीत सुमारे तीन कोटी लिटर पाणी जिरवले आहे. जर ठिकठिकाणी मिळून ३० हजार झाडे लावली आहेत.
यासंदर्भात धवरुख संस्थेचे अध्यक्ष प्रा. रुद्रेश म्हामल यांनी गोमन्तकशी बोलताना सांगितले की, राज्यातील आठ तालुक्यांमध्ये आम्ही भूजल संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. काही भागात जमिनीत पाणी मुरावे यासाठी प्रयोग केले आहेत. माळरानावर किंवा जमिनीत खोदलेल्या खड्ड्यात प्लॅस्टिक बॅरल घातले जाते. नंतर या बॅररला बाजूने दगड व माती घातली जाते.
याला काही छिद्रे पाडली जातात. यातून हे पाणी जमिनीत झिरपते. मांद्रे येथील माळरानावर आम्ही खड्डे मारुन पावसाचे पाणी जिरवण्याचा प्रयत्न केला. परिणामी, या माळरानाच्या पायथ्याशी असलेल्या विहिरी, ज्या उन्हाळ्यात कोरड्या पडायच्या, त्यात पाण्याचा अंश राहू लागला. पावसाचे पाणी थेट समुद्रात जाते, याचे पुनर्भरण व्हावे यासाठी हा पुढाकार असल्याचे म्हामल म्हणाले. मांद्रे येथील माळरानावर जे पर्यटन क्षेत्र म्हणून समोर आले आहे, तिथे आगीच्या घटना घडल्या. परिणामी, झाडे जळाली, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली.
यंदाच्या पर्यावरणदिनानिमित्त ‘प्लॅस्टिकवर मात’ अशी थीम आहे. काही लोक कचऱ्यात काचा टाकतात. त्यामुळे गुरांना कचरा खाताना इजा पोहचते. या उपक्रमाअंतर्गत धवरुख मांद्रेतील माळरानावर कचराकुंड्या ठेवतील, तसेच उद्या गुरुवारी आम्ही आमच्या स्वयंसेवक व विद्यार्थ्यांसोबत काचा गोळा (कचरा) करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे म्हामल यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.