Mandrem: भिवपाची गरज ना! घरे, दुकाने सुरक्षित राहतील; मांद्रेत एमडीआर रस्ता होऊ देणार नाही, नागरिकांचा ठराव

Mandrem MDR Road: बैठकीत एमडीआर १८ व अन्य रस्त्यांबाबत २५ किंवा १५ व १० मीटर रस्त्यासाठी होणारे सर्वेक्षण ताबडतोब बंद करावे, असा एकमुखी ठराव घेण्यात आला.
Road
Road ConstructionDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: मांद्रेतील जिल्हा मुख्य मार्ग (एमडीआर) प्रकरणात पंचायत क्षेत्रातील सरपंच व ग्रामस्थांनी योग्य भूमिका घेतल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. जनतेच्या भावना लक्षात घेऊन या प्रकरणी एकाही घर व आस्थापनाला धोका पोहोचू देणार नाही. सर्व घरे, दुकाने सुरक्षित राहतील, असे आश्वासक उद्‍गार मांद्रे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा हाउसिंग बोर्डचे चेअरमन जीत आरोलकर यांनी काढले.

मांद्रे येथील एमडीआर रस्त्याविषयी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यासाठी मांद्रे येथील जागृत नागरिक समितीतर्फे हरमल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मांद्रे मतदारसंघातील नऊही पंचायत क्षेत्रातील सुमारे ७०० नागरिक उपस्थित होते.

या बैठकीत एमडीआर १८ व अन्य रस्त्यांबाबत २५ किंवा १५ व १० मीटर रस्त्यासाठी होणारे सर्वेक्षण ताबडतोब बंद करावे, असा एकमुखी ठराव घेण्यात आला. यावेळी उपस्थित ७०० जणांनी हात उंचावून या ठरावास समर्थन दिले.

Road
Bhoma Road: ऐतिहासिक मंदिरांना हात लावू नका, रस्‍ता आराखड्यात बदल करा; भोम महामार्गाबाबत सरदेसाईंची मागणी

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार दयानंद सोपटे, हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, मोरजी जीप सदस्य सतीश शेटगावकर, हरमलच्या सरपंच अनुपमा मयेकर, केरीच्या सरपंच धरती नागोजी, पालयेच्या सरपंच स्नेहा गवंडी, पार्सेचे सरपंच अजय कळंगुटकर, मांद्रेचे उपसरपंच संपदा आजगावकर, आगरवाड्याच्या सरपंच शिल्पा नाईक, मांद्रेचे पंच प्रशांत नाईक, मोरजीचे सरपंच पवन मोरजे उपस्थित होते.

Road
Mandrem: 30 हजार झाडे लावली; 15 हजार जगवली! मांद्रेतील ‘धवरुख’च्या तरुणांची कामगिरी

मांद्रेत रस्त्याची कैफियत ऐकून कोणीही भिवपाची गरज नाही. मुख्यमंत्र्यांकडे वैयक्तिक बोलणी झाली आहे. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी वैयक्तिक संबंध चांगले असून मांद्रेतील जनतेला ते न्याय देतील अशी अपेक्षा आहे, असे माजी आमदार दयानंद सोपटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com