NEET Paper Leak Dainik Gomantak
गोवा

NEET Paper Leak: सीबीआयचा 'नीट' दणका; देशभर कारवाई; सहाजणांच्‍या आवळल्‍या मुसक्‍या

CBI Arrests In NEETCase: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने बुधवारी देशाच्या विविध भागांमध्ये कारवाई करताना, राज्यातील दोघांसह सहा जणांना अटक केली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

नवी दिल्ली: ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने बुधवारी देशाच्या विविध भागांमध्ये कारवाई करताना, राज्यातील दोघांसह सहा जणांना अटक केली. या प्रकरणात अनेक ठिकाणी कारवाई करण्यात येत असून, काही जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात पुण्यातही दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

देशभरात तीन मे रोजी घेण्यात आलेल्या ‘नीट’ची प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आले होते. त्यामुळे राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता आणि सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला होता. सीबीआय आणि राजस्थान पोलिसांचे विशेष कार्यगट (एसओजी) यांच्या समन्वयातून हा तपास सुरू आहे. या प्रकरणात सीबीआयने कारवाईचा बडगा उचलताना, सहा जणांना अटक केली.

यामध्ये महाराष्ट्रातून नाशिकमधील शुभम खैरनार आणि अहिल्यानगरमधील धनंजय लोखंडे; जयपूरमधून मांगीलाल बिवाल, विकास बिवाल, दिनेश बिवाल आणि गुरुग्राममधून यश यादव यांचा याशिवाय, जयपूरमधून तिघे आणि गुरुग्राममधून एकास अटक करण्यात आली आहे. याशिवाय, अनेक संशयितांची चौकशी करण्यात येत आहे. ‘सीबीआय’ने देशातील अनेक भागांमध्ये तपास सुरू केला असून, मोबाइलसह विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेण्यात आली आहे.

त्यातील संदेश देवाण-घेवाणीच्या ॲपच्या न्यायवैद्यक तपासणीतून प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने विविध ठिकाणी पाठविण्यात आली, याचा तपास करण्याचा प्रयत्न आहे.राजकीय संबंधांचा आरोप या प्रकरणातील आरोपी दिनेश बिलाल हा भाजपचा पदाधिकारी आहे, असा आरोप राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. मात्र, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष मुकेश दधिच यांनी हे आरोप फेटाळले असून, त्याच्याकडे कोणतेच पद नाही, असे स्पष्ट केले आहे.

खैरनारची दिल्लीत चौकशी :

शुभम खैरनारला मंगळवारी ताब्यात घेण्यात आले होते. त्याला स्थानिक न्यायालयाने प्रवास कोठडी मंजूर केल्यानंतर सीबीआयने त्याला दिल्लीमध्ये आणले. तेथे त्याची चौकशी केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT