NEET PG Goa: गोव्यात पहिला, तर भारतात 212 वा क्रमांक! आंजनेयने उंचावली ‘गोमेकॉ’ची प्रतिष्ठा; नीट-पीजी परीक्षेत दैदिप्यमान यश

Anjaneya Kamat NEET PG Rank: कोलवा येथील डॉ. आंजनेय कामत यांनी नीट-पीजी परीक्षेत गोव्यात पहिला क्रमांक, तर भारतात २१२ वा क्रमांक प्राप्त केला.
Dr Anjaneya Kamat NEET PG Rank
Dr Anjaneya Kamat NEET PG RankDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: कोलवा येथील डॉ. आंजनेय कामत यांनी नीट-पीजी परीक्षेत गोव्यात पहिला क्रमांक, तर भारतात २१२ वा क्रमांक प्राप्त केला. या देदीप्यमान कामगिरीमुळे गोव्यातील वैद्यकीय क्षेत्राला उभारी लाभली असून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाची प्रतिष्ठाही उंचावली आहे.

या परीक्षेत अटीतटीची स्पर्धा असते. शिवाय जागा कमी असल्याने आव्हानही मोठे होते. त्यामुळे एमबीबीएसच्या पाचही वर्षांत मी नियमित अभ्यास केला. गत वर्षभरात स्वत:ला अभ्यासात झोकून दिले.

Dr Anjaneya Kamat NEET PG Rank
GMC: 3.20 लाखांच्या गैरवापराचा आरोप! 13 जणांची साक्ष; 2 दशकांनंतर गोमेकॉचे लॅब असिस्टंट निर्दोष मुक्त

मला आई हर्षा, बाबा जयंत, कुटुंबातील इतर सदस्य, मित्र, तसेच वर्गमित्रांचे प्रोत्साहन लाभले. हे माझे एकट्याचे यश नसून ते सर्वांचे असल्याचे आंजनेय यांनी नमूद केले. मडगावातील विद्या विकास अकादमीमध्ये डॉ. कामत यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत; परंतु फी ही लाखांच्या घरात आहे.

Dr Anjaneya Kamat NEET PG Rank
GMC Reservation: महत्वाची बातमी! वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात OBC आरक्षण लागू; आरोग्य खात्याकडून आदेश जारी

आता विविध ॲप उपलब्ध असून ते स्वस्तात विकत घेता येत असल्याने अभ्यासक्रम परवडणारा शिवाय सहज उपलब्ध आहे. क्लिनिकलपेक्षा सर्जिकल शाखेत जास्त रस असल्याने मी ऑर्थोपेडिक्स शाखा निवडली आहे. शिवाय रुग्णांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. आता या शाखेला मागणीही वाढत आहे, असे कामत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com