NEET Student goa Dainik Gomantak
गोवा

NEET Exam : ‘नीट’ रद्द करा; पणजीत निदर्शने

NEET Exam : केंद्र सरकारला जाब विचारणार : काँग्रेस नेते, ‘एनएसयूआय’ आक्रमक

गोमन्तक डिजिटल टीम

NEET Exam :

पणजी, ‘नीट’ परीक्षेचा जो सावळा गोंधळ चालला आहे, तो विद्यार्थ्यांवर अन्‍याय आहे. त्‍या विरोधात विद्यार्थी एकत्र येत असून, केंद्र सरकारला जाब विचारला जाईल. ‘नीट’ परीक्षा पुन्‍हा घेण्‍यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.

गोवा प्रदेश काँग्रेस समितीने येथील आझाद मैदानावर छेडलेल्‍या आंदोलनात ते बोलत होते. काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, ‘एनएसयूआय’चे राष्ट्रीय सरचिटणीस अहराज मुल्ला, ‘एनएसयूआय’चे अध्यक्ष नौशाद चौधरी, वरिष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख, महिला काँग्रेस अध्यक्षा बिना नाईक, शंभू भाऊ बांदेकर, मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, काँग्रेसचे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.

काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी नीट परीक्षा घोटाळ्याचा आरोप करत भाजप सरकारचा निषेध केला. नीट परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी काँग्रेस पक्ष हा मुद्दा संसदेत उपस्थित करेल, असे विद्यार्थ्यांना आश्वासन दिले. आमचे नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांना पूर्ण पाठिंबा दिला, असेही ते पुढे म्हणाले.

२४ जून रोजी घेराव घालण्याची तयारी

सरकारने नीट परीक्षा रद्द करण्याबाबत कारवाई केली नाही, तर नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया २४ जूनला ‘घेराव’ घालेल, असे ‘एनएसयूआय’चे राज्य अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी जाहीर केले. काँग्रेसचे पदाधिकारी तुलिओ डिसोजा, गुरुदास नाटेकर, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर आंदोलनात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या विरोधात सर्वांनी घोषणाबाजी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT