Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Curtorim Police Station Assault Case: माणुसकीला काळिमा फासणारी आणि समाजमन सुत्र करणारी घटना कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.
Curtorim Police Station Assault Case
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: माणुसकीला काळिमा फासणारी आणि समाजमन सुत्र करणारी घटना कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. नुवे येथे एका 85 वर्षीय असहाय्य वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी पोलिसांनी स्टॅनली कुतिन्हो याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. संशयित फरार असून, त्याचा कसून शोध सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 7) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. पीडित महिला घरी एकटी असताना संशयिताने घरात प्रवेश करुन तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर पीडितेच्या सुनेने गुरुवारी (ता. 9) पहाटे कुडतरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Curtorim Police Station Assault Case
Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम 332 (ब), 64(1), 74 आणि 76 अन्वये गुन्हा नोंदवला. प्राथमिक तपासात संशयित हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून, यापूर्वी त्याच्याविरुद्ध म्हापसा (Mapusa) पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये तसेच वेर्णा परिसरातही गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Curtorim Police Station Assault Case
Goa crime: तुये खुनीहल्ला प्रकरण; तिळारी परिसरात नेऊन नर्सला मारण्‍याचा होता डाव? संशयित गौतमला 7 दिवसांची पोलिस कोठडी

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वेरॉनिका कुतिन्हो तपास करीत आहेत. प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने तपासाच्या हितासाठी अधिक तपशील जाहीर करण्यास पोलिसांनी नकार दिला. दरम्यान, पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी संशयिताचा शोध सुरु असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com