ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

K Srikkanth Slams Indian Team Management: इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियाच्या सलग पराभवाचा मुद्दा आता चांगलाच तापला असून, माजी खेळाडू आणि समीक्षकांकडून संघावर जोरदार टीका होत आहे.
K Srikkanth Slams Indian Team Management
K Srikkanth Dainik Gomantak
Published on
Updated on

K Srikkanth Slams Indian Team Management: टीम इंडिया सध्या परदेश दौऱ्यांवर विजयासाठी संघर्ष करत आहे. इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियाच्या सलग पराभवाचा मुद्दा आता चांगलाच तापला असून, माजी खेळाडू आणि समीक्षकांकडून संघावर जोरदार टीका होत आहे. यातच भारताचे माजी कर्णधार के. श्रीकांत यांनी तर थेट टीम मॅनेजमेंटवर निशाणा साधला. युवा फलंदाज तिलक वर्माला इतक्या घाईघाईने उपकर्णधार बनवण्याच्या निर्णयावर आणि वेगवान गोलंदाजीसमोर त्याला वाचवण्याच्या रणनीतीवर श्रीकांत यांनी सडकून टीका केली.

दुसरीकडे, सलग पराभवांमुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावरही आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संपूर्ण संघ सध्या दबावाखाली वावरत असल्याचे चित्र आहे. के. श्रीकांत यांनी तिलक वर्माच्या सध्याच्या सुमार फॉर्मवर आणि मॅनेजमेंटच्या भूमिकेवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले की, तिलक आधीच उपकर्णधार झाला आहे आणि असेच सुरु राहिले तर तो लवकरच कर्णधारही बनेल. इंग्लंडमधील (England) खेळपट्ट्यांवरील वेग आणि बाऊन्स पाहून कदाचित तिलक वर्माने स्वतःच बाहेर जाण्यास नकार दिला असावा, कारण तो मैदानावर पूर्णपणे संभ्रमात दिसतोय. श्रीकांत यांनी तर तिलक वर्माच्या जागी संजू सॅमसनला संघात खेळवणे अधिक पसंत करेन, असे स्पष्ट मत मांडले.

K Srikkanth Slams Indian Team Management
ENG vs IND: "जेव्हा संघ बदलतो, तेव्हा असं होतं..."! टीम इंडियाच्या दारुण पराभवानंतर गंभीरनं स्पष्टच सांगितलं; बुमराह-हार्दिकचं नाव घेत केला बचाव

उपकर्णधारपद मिळाल्यापासून तिलकची बॅट पूर्णपणे शांत आहे. त्याने गेल्या काही डावांमध्ये अवघ्या 19, 55, 13, 24* आणि 3 धावा केल्या आहेत. आयर्लंडविरुद्धच्या एका अर्धशतकी खेळीचा अपवाद वगळता, एकाही सामन्यात त्याला मॅच-विनिंग कामगिरी करता आलेली नाही.

K Srikkanth Slams Indian Team Management
IND vs ENG: 785 चेंडू,100 षटकार... 20 चेंडूत अर्धशतक! अभिषेक शर्माने टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, 'अशी' कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

श्रीकांत यांच्या मते, जर तिलक वर्मा संघाचा मुख्य फलंदाज आणि उपकर्णधार आहे, तर त्याने स्वतः जबाबदारी घ्यायला हवी. मॅनेजमेंटच्या रणनीतीवर बोट ठेवताना ते म्हणाले की, तुम्ही त्याला मुख्य फलंदाज बनवता, पण तरीही वेगवान गोलंदाजी सुरु असताना त्याला खेळवण्याऐवजी अक्षर पटेलला आधी फलंदाजीसाठी पाठवता. याचा अर्थ स्पष्ट आहे की, तिलक वर्मा शॉर्ट-पिच चेंडूंसमोर कमकुवत आहे हे माहित असल्यामुळेच मॅनेजमेंट त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला संघातून डच्चू द्यायला हवा, अशी मागणी मी वारंवार करत आहे, पण मॅनेजमेंट मात्र त्याला पाठीशी घालत आहे. या अंतर्गत वादांमुळे आता टीम इंडियापुढील अडचणी अधिक वाढल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com