BJP Goa news Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: निवडणुकीपूर्वी भाजपची 'युवा' भरती! पर्वरीत 100 तरुणांचा जाहीर प्रवेश; पर्यटनमंत्री खंवटेंनी फुंकले विजयाचे रणशिंग

Porvorim Youths Join BJP: पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखाली पर्वरीतील शेकडो युवक-युवतींनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला

Akshata Chhatre

पर्वरी: जिल्हा पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत पर्वरी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखाली पर्वरीतील शेकडो युवक-युवतींनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यामुळे पर्वरीतील सुकूर आणि पेन्ह द फ्रान्स या दोन्ही जिल्हा पंचायत मतदारसंघांत भाजपची ताकद दुप्पट झाली असून, भाजप उमेदवारांच्या विजयाची खात्री व्यक्त केली जात आहे.

भगवी शाल देऊन स्वागत

पर्वरी येथील कदंबा हॉटेल सभागृहात हा विशेष पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी रोहन खंवटे यांनी सर्व नवमतदारांचे गुलाब पुष्प आणि भाजपची भगवी शाल देऊन पक्षात स्वागत केले. या सोहळ्याला भाजपचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर, भाजयुमोचे अध्यक्ष तुषार केळकर, मंडळ अध्यक्ष विनीत परब, पेन्ह द फ्रान्‍सचे उमेदवार संदीप साळगावकर आणि सुकूरचे उमेदवार अमित अस्नोडकर उपस्थित होते.

'डबल इंजिन' सरकारचा प्रभाव

काही दिवसांपूर्वीच युवा वर्गाची एक कोपरा बैठक घेण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील 'डबल इंजिन' सरकारच्या कार्यपद्धतीमुळे प्रभावित होऊन या तरुणांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला.

"केंद्र सरकारच्या 'विकसित भारत' आणि राज्य सरकारच्या 'स्वयंपूर्ण गोवा' या संकल्पनांमुळे नव्या दमाचा युवक प्रभावित झाला आहे. नवमतदारांचा ओढा भाजपकडे असून पर्वरीत भाजपची ताकद आता प्रचंड वाढली आहे." असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे दरम्यान म्हणाले.

विकासाच्या बाजूने चालणारा पक्ष

भाजपचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी यावेळी सांगितले की, भाजप हा केवळ विकासासाठी काम करणारा पक्ष आहे. युवा आणि महिला कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्यानेच नवमतदार पक्षाकडे आकर्षित होत आहेत. मंडळ अध्यक्ष विनीत परब यांनी या प्रवेशामुळे भाजप उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

सखा सोबती बनला वैरी? सुरक्षेची जबाबदारी झटकून ट्रम्प आता ग्रीनलँड 'गिळंकृत' करणार? - संपादकीय

Weekly Finance Horoscope: जानेवारीचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी ठरणार 'गेमचेंजर'! नोकरी-व्यवसायात मोठी झेप! 'या' राशींचे आर्थिक प्रश्न सुटणार

Chodan Bridge: चोडणवासीयांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'चोडण पुला'साठी 274.83 कोटींची निविदा, तीन वर्षांत पूर्ण होणार पूलाचं बांधकाम

CM Dev Darshan Yatra: 'मुख्यमंत्री देवदर्शन यात्रे'साठी दहा कोटी रुपयांची तरतूद! मंत्री फळदेसाई यांची माहिती

SCROLL FOR NEXT