NCP Dainik Gomantak News
गोवा

NCP गोव्यात स्वबळावर निवडणूक लढणार

नुवे, बाणावली, नावेली, दाबोळी आणि वास्को या 5 जागेवर उमेदवार उभे करणार असून उत्तर गोव्यातून आणखी 5 जागा लढवू असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

काँग्रेस पक्षाने युतीची मागणी धुडकावून लावल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून आम्ही किमान 10 जागा लढवू अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जुझे फिलिप यांनी दिली.

दक्षिण गोव्यात (South Goa) आम्ही नुवे, बाणावली, नावेली, दाबोळी आणि वास्को या 5 जागेवर उमेदवार उभे करणार असून उत्तर गोव्यातून आणखी 5 जागा लढवू असे त्यांनी सांगितले. दाबोळी येथून डिसोझा स्वतः रिंगणात उतरणार असून नुवेतून लिंडन मोंतेरो याना उमेदवार म्हणून निवडणूकीत उतरवण्याची तयारी चालू आहे. बाणावलीत तृणमुलने उमेदवारी नाकारलेले टोनी डायस हे राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात.

दरम्यान, गोव्यात काँग्रेसच्या काही नेत्यांची भाजपकडे छुपी युती असल्यानेच राष्ट्रवादी पक्षाकडे युती करण्याचे काँग्रेस टाळत असल्याचा आरोप डिसोझा यांनी केला. मंत्री मोविन गुदिन्हो याना दाबोळीतून सहज निवडून येता यावे यासाठीच काँग्रेसने या मतदारसंघात विरियातो फेर्नांडिस या सारखा कमकुवत उमेदवार उभा केला आहे असा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT