Goa Election 2022: Aleixo Reginaldo Lawrence  Dainik Gomantak
गोवा

Goa Election 2022: आलेक्स रेजिनाल्ड यांना राष्ट्रवादीच्या पायघड्या

फिलीप नेरी रॉड्रिग्स, मिकी पाशेकोही वाटेवर

दैनिक गोमन्तक

मडगाव: काँग्रेस पक्षाने अव्हेरलेले कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात सामील होण्याचे आमंत्रण दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी पक्षात (Goa NCP) अन्य काही नेते नजीकच्या काळात सामील होऊ शकतात, असेही संकेत त्यांनी दिले.

(NCP has invited Aleixo Reginaldo Lawrence to join party for goa election)

जलस्रोतमंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स हेही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू असून माजी मंत्री मिकी पाशेको हेही त्याच वाटेवर असल्याचे सांगितले जाते. यासंबंधी डिसोझा यांना विचारले असता, अजून तरी यापैकी दोघांनीही आमच्याशी संपर्क साधलेला नाही. त्यांनी संपर्क साधला तर त्यावर पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील, असे ते म्हणाले.

काँग्रेसचे (Goa Congress) उमेदवार पाडण्याचा पण

काँग्रेसने उमेदवारी डावलून बाणावलीत टोनी डायस यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले माजी मंत्री मिकी पाशेको (Mickey Pashko) यांनी बाणावली आणि नुवे या दोन्ही मतदारसंघांत काँग्रेसचे उमेदवार पाडण्याचा पण केल्याचे वृत्त आहे. काँग्रेस गट समितीला अजिबात कल्पना न देता टोनी डायस यांना उमेदवारी दिल्याने बाणावली काँग्रेस गटात संतापाचे वातावरण पसरले आहे. या मतदारसंघात मिकी पाशेको यांच्यासह रॉयला फर्नांडिस, जीना परेरा, एडविन बार्रेटो आणि ट्रॅव्हर फर्नांडिस यांनी काँग्रेस उमेदवारीवर दावा केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coconut Tree: पोर्तुगीज येण्याआधीपासून गोव्यात असलेला, 80 देशांत लागवड होणारा कल्पवृक्ष 'नारळ'

वीज कोसळून कर्नाटकच्या व्यक्तीचा गोव्यात मृत्यू? कोलवा येथे भाड्याच्या खोली बाहेर आढळला मृतदेह

अग्रलेख: भारतात पावसाच्या एका तडाख्यातच डांबर, खडी, सिमेंट अदृश्य का होऊन जाते?

Goa Today's News Live: फोंड्यात थंड पेयाच्या सीलबंद बाटलीत आढळली मिरची पूड

मडगावात सुलभ शौचालयाजवळ आढळला भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह

SCROLL FOR NEXT