TMC leader Sushmita Dev  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात आज तृणमूल आणि राष्ट्रवादीची बैठक; निवडणुकीतील पराभवाचे करणार विश्लेषण

विधानसभा निवडणुकीत तृणमूल आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या कारणांचे विश्लेषण करण्यासाठी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्यांनी आज पणजीत स्वतंत्रपणे त्यांच्या उमेदवारांच्या बैठका बोलावल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत तृणमूल आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही.

निवडणुकीसाठी तृणमूलने महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीशी युती केली होती, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि शिवसेनेने (Shiv Sena) ही निवडणूक एकत्र लढवली होती. तृणमूलच्या पुनरावलोकन समितीमध्ये अशोक तन्वर यांच्यासह राज्यसभा खासदार सुष्मिता देव आणि सौरव चक्रवर्ती यांचा सह-प्रभारी म्हणून समावेश आहे. तृणमूलचे सर्व उमेदवार,सदस्य बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांच्यासह तृणमूलचे (TMC) प्रमुख नेते सदस्यांसोबत वन-टू-वन बैठक घेतील.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जोस फिलिप डिसोझा यांनी सांगितले की, शनिवारी पक्षाच्या मुख्य कार्यालयात पक्षाचे उमेदवार, कार्यकर्त्यांसह प्रदेश कार्यकारिणीची संयुक्त बैठक होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT