NCP Dainik Gomantak
गोवा

सुभाष वेलिंगकरांविरोधात हल्लाबोल; राष्ट्रवादीकडून वक्‍तव्‍याचा निषेध

राष्ट्रवादीकडून वक्‍तव्‍याचा निषेध: राजकीय नेते एकवटले

दैनिक गोमन्तक

पणजी: हिंदू रक्षा महाआघाडीच्‍या झेंड्याखाली गोवा सुरक्षा मंचचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्‍या विरोधात केलेल्‍या विधानाचे पडसाद राज्‍यभरातून उमटत असून या विरोधात राजकीय नेते एकवटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज, शनिवारी प्रा. वेलिंगकर यांच्‍यावर जोरदार हल्लाबोल केला.

शेकडो वर्षांपासून गोव्‍यात हिंदू, ख्रिश्‍चन, मुस्‍लिम, इतर धर्माचे आणि समुदायाचे लोक गुण्यागोविंदाने राहात आहेत. सुभाष वेलिंगकरांनी सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्‍या विरोधात विधान करून राज्‍यातील शांतता भंग करण्याचे काम केले आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी टीका केली. येथील पक्षाच्‍या कार्यालयात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष अविनाश भोसले, जेम्‍स रॉड्रिग्ज आणि अलॉयसिस डिसिल्‍वा उपस्‍थित होते.

आपल्‍या धर्माविषयी आणि देवाविषयी सर्वांना श्रद्धा असते. आमच्‍या संतांविषयी कोणी काही बोललेले आम्‍ही खपवून घेणार नाही. प्रा. वेलिंगकर जे काही करत आहेत. बोलत आहेत, ते त्‍यांनी थांबवावे. अन्‍यथा राष्ट्रवादी काँग्रेसच नव्‍हे, तर गोमंतकीय नागरिकही गप्‍प बसणार नाहीत, असा इशाराही त्‍यांनी यावेळी दिला. यावेळी अविनाश भोसले यांनीही प्रा. वेलिंगकर यांच्‍या विधानाचा चांगलाच समाचार घेतला.

राज्‍यातील राजकीय नेत्‍यांनीही प्रा. वेलिंगकरांवर चोहोबाजूंनी घेरले आहे. पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी संतप्‍त भावना व्‍यक्‍त केल्‍या. गोव्‍यातील बंधूभाव टिकून आहे. कोणीही काहीही बोलले म्‍हणून गोमंतकीय एकोपा संपवणार नाही. यामुळे एखाद्याने काहीही बोलून सामाजिक दरी निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो यशस्‍वी होणार नाही, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT